Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा केव्हा नवग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान नवग्रहातील असाच एक महत्त्वाचा ग्रह एकदा 27 तारखेला नक्षत्र परिवर्तन करणार आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखतात आणि हाच बुध ग्रह येत्या 27 तारखेला नक्षत्र परिवर्तन करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुध ग्रह 27 एप्रिल 2025 रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल आणि याचा प्रभाव राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशींवर दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि यांना या काळात चांगली प्रगती साधता येणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच या संबंधित राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे आणि अच्छे दिन सुरू होतील. दरम्यान आता आपण बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मकर राशीं : 27 एप्रिल ही तारीख या राशीच्या लोकांसाठी अधिक खास करणार आहे कारण की या दिवसापासून या राशीच्या लोकांचे जीवन बदलणार आहे. या लोकांच्या आयुष्यात यापुढे अनेक सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील आणि हे लोक प्रत्येकच क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. या लोकांची संभाषण करण्याची टेक्निक आणि संवाद कौशल्य या काळात अधिक चांगले होणार आहे. यामुळे हे लोक कामाच्या ठिकाणी आपली एक वेगळी छाप सोडण्यात यशस्वी होतील. सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे असो किंवा मग मुलाखत असो सर्वच ठिकाणी तुमच्या संभाषण कौशल्याची तुम्हाला मदत होणार आहे. हा काळ कलेचा राहणार आहे, विशेषतः सोशल मीडिया मार्केटिंग, लेखन, कंटेंट रायटिंग, न्यूज रायटिंग अशा कामांमध्ये गुंतलेल्या लोकांना या काळात चांगले यश मिळणार आहे.
मीन : मकर राशि प्रमाणेच मीन राशीच्या लोकांनाही या काळात चांगला लाभ मिळणार आहे. 27 एप्रिल पासून या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा समाप्त होणार आहे. या काळात या लोकांवर माता सरस्वतीची विशेष कृपा राहणार आहे. यांच्या जिभेच्या मधुरतेमुळे या काळात अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. या काळात या लोकांची बोलण्याची पद्धत ही पूर्णपणे भिन्न दिसू शकते. मऊ आणि प्रेमळ बोलण्यामुळे काही लोक या लोकांकडे आकर्षित होतील. या काळात लोक तुमच्या मतांचा आणि भूमिकेचा मान राखतील, आदर करतील. या काळात हे लोक इतरांना चांगले मार्गदर्शन सुद्धा करताना दिसणार आहेत.
वृश्चिक राशी : मकर आणि मीन राशि प्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता संपणार आहे. या लोकांच्या आयुष्यात आगामी काळात अनेक सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. पैसा शिक्षण नोकरी व्यवसाय आरोग्य अशा सर्वच बाबतीत हा काळ या लोकांसाठी लाभाचा ठरु शकतो. विशेषता लेखन कला संगीत अशा कलेच्या संदर्भातील लोकांना या काळात चांगले यश मिळताना दिसेल.