Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अक्षय तृतीयाच्या आधीच आनंदाची बातमी समोर येत आहे विशेषता राजधानी मुंबई ते नाशिक यादरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आजची बातमी अधिक आनंदाची राहणार आहे. कारण की भविष्यात मुंबई ते नाशिक दरम्यान लोकल ट्रेन धावताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कसारा ते मनमाड या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
खरे तर मुंबई ते नाशिक या दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. यामुळे या दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजेच लोकल ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. मात्र प्रवाशांच्या या मागणीकडे रेल्वे बोर्डाकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. कारण म्हणजे या मार्गावर लोकल सुरू करण्यात एक मोठा अडथळा होता आणि तो अडथळा होता कसारा घाटाचा.

पण आता हा मोठा अडथळा दूर झाला आहे कारण की कसारा ते मनमाड या दरम्यान एक नवीन रेल्वे मार्ग तयार केला जात असून या नव्या रेल्वे मार्गामुळे आता नाशिक ते मुंबई दरम्यान कसारा घाट वगळून थेट लोकल ट्रेन धावणे शक्य होणार आहे. या नव्या रेल्वे मार्गावर दोन मोठे बोगदे राहणार आहेत पण मार्गावरील चढ-उतार कमी राहणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. दरम्यान आता आपण हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा असेल यास बाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा रेल्वे मार्ग प्रकल्प?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कसारा घाट ते मनमाड या रेल्वे मार्गाचे अंतर 140 किलोमीटर इतके असून दरम्यान सध्या अस्तित्वात असणाऱ्या याच मार्गाला आता समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. अर्थातच नवीन मार्ग सुद्धा 140 किलोमीटरचाच असेल. या नव्या रेल्वे मार्गात कसारा घाटात बोगदा तयार केला जाणार आहे आणि यात रेल्वे लाईन टाकली जाईल. बोगद्याचा डायमीटर सुद्धा वाढणार आहे.
हेच कारण आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते मुंबई दरम्यान लोकल ट्रेन धावणार अशी आशा व्यक्त होत आहे. विशेष बाब अशी की या नवीन रेल्वे मार्गाचा प्रकल्प आराखडा सुद्धा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्रकल्प आराखडा मध्य रेल्वे कडून पूर्ण झाला असून लवकरच याला मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवले जाणार आहे. या सदर आराखड्यानुसार या रेल्वे मार्गावर एकूण बारा बोगदे तयार केले जाणार आहे.
तसेच या मार्गावर चार स्थानके विकसित होतील ज्यामुळे कसारा ते मनमाड यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे आणि या परिसरातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रस्तावित मार्गावरील रेल्वे स्टेशन बाबत बोलायचं झालं तर नव्या मार्गावर न्यू नाशिक रोड, न्यू पाडळी, वैतरणा नगर आणि चिंचल खैरे हे चार स्थानके तयार होणार असल्याची बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी जवळपास 4000 कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकल्पाचे काम नेमके कधी सुरू होणार आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खरंच मुंबई ते नाशिक दरम्यान लोकल ट्रेन धावणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.