Indian Railway : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने आणि रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात.
दरम्यान जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता रेल्वे प्रवाशांना चक्क धावत्या ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. दरम्यान, आता आपण ही सुविधा कोणत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरू करण्यात आली आहे ? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेमध्ये एटीएम
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार एका संवाद बैठकीत पुढे आला. भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत हा विचार समोर आला आणि तेव्हापासूनच या संकल्पनेवर काम सुरू झाले.
एटीएमची चाचणी
दरम्यान या संकल्पनेला बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिसाद दाखवला आणि रेल्वे गाडीमध्ये एटीएम बसवण्याचा निर्णय झाला. महत्त्वाची बाब अशी की रेल्वे गाडीमध्ये एटीएम फिट झाले असून सध्या या एटीएमची चाचणी केली जात आहे. गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
म्हणजेच पंचवटी एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. या ट्रेनमध्ये एकूण 22 डब्बे आहेत.
पंचवटी एक्सप्रेस एटीएमचा लाभ
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड ते मुंबई दरम्यान जी पंचवटी एक्सप्रेस धावते ती संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड आहे, याचाच अर्थ या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व श्रेणीतील प्रवाशांना गाडीमध्ये उपलब्ध होणाऱ्या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.
नक्कीच गाडीमध्ये एटीएम असले तर पैशांसाठी प्रवाशांना जास्त वणवण करावी लागणार नाही. जर प्रवाशांना अचानक कॅशची गरज भासली तर ते गाडीमधूनच पैसे काढू शकतात आणि अशा तऱ्हेने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन
यामुळे प्रवाशांना तर चांगला लाभ मिळणारच आहे शिवाय रेल्वेच्या महसुलात सुद्धा वाढ होणार आहे. दरम्यान, पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने ही देशातील पहिलीच एटीएम असणारी एक्सप्रेस ट्रेन बनली आहे.