7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायर्ड झाल्यानंतर कोणकोणते लाभ मिळतात ?

सध्या देशात आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकारने उशिरा का होईना पण आठवा वेतन आयोग स्थापित करण्यास मान्यता दिली आहे अन यामुळे नियोजित वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण सध्याच्या सातव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

7th Pay Commission : कोणी सरकारी नोकरी म्हटलं की अनेकांचा अशा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सरकारी नोकरीला भारतात विशेष मान आहे. खाजगीत करोडो रुपये कमावत असतील तरी सरकारी नोकरी बरी असे म्हणणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात.

खरे तर सरकारी नोकरी करणाऱ्यांना सुरक्षितता मिळत असते. नोकरीची सुरक्षितता तसेच अलीकडे चांगला पगारही मिळतोय. येत्या काही दिवसांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग सुद्धा लागू होणार आहे, यामुळे त्यांचा पगार आणखी वाढणार आहे.

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात चांगला पगार मिळतो आणि पगारा व्यतिरिक्त इतरही अनेक लाभ मिळत असतात. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय लाभ सुद्धा मिळतो. पण रिटायर्ड झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळतो?

दरम्यान आज आपण याच बाबतची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणते लाभ मिळतात याबाबतची माहिती आता आपण जाणून घेऊयात.

सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात हे लाभ

रजा रोखीकरण लाभ : सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत असतो. सेवा काळामध्ये जर सरकारी कर्मचाऱ्याने मंजूर असलेल्या सुट्ट्यांचा लाभ घेतला नाही तर त्यांना अशा न उपभोगलेल्या रजा करिता आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ कमाल तीनशे दिवसांसाठी मिळतो. यापेक्षा जास्तीचे दिवस रजा रोखीकरण लाभासाठी अपात्र ठरतात.

वैद्यकीय लाभ : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा काळात वैद्यकीय लाभ मिळतो हे आपल्याला साऱ्यांनाच माहिती आहे. पण काही विशिष्ट परिस्थितीत रिटायरमेंट नंतर सुद्धा याचा लाभ मिळू शकतो. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गृह विभाग किंवा इतर अत्यावश्यक विभागामध्ये कार्यरत असताना जडलेल्या आजाराकरिता सेवानिवृत्तीनंतर सुद्धा वैद्यकीय लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजे हा लाभ साऱ्याच कर्मचाऱ्यांना मिळत नाही.

सेवानिवृत्ती उपदान : सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी म्हणजेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळते. आधी ही रक्कम कमाल 14 लाख रुपये एवढी होती मात्र आता यामध्ये आणखी सहा लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कमाल 20 लाख रुपये इतकी सेवानिवृत्ती उपदान रक्कम मिळणार आहे.

पेन्शन : सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतो. केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारानुसार आणि सेवा कालावधीनुसार त्यांना पेन्शन मिळणार आहे.

कौटुंबिक पेन्शन : फक्त पेन्शनच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक पेन्शनचा सुद्धा लाभ मिळतो. सेवा बजावताना किंवा रिटायर्ड झाल्यानंतर जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा प्रकरणांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पेन्शन दिली जाते आणि यालाच कौटुंबिक पेन्शन म्हणतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe