6000 MAH बॅटरी,50 MP कॅमेरा, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह लॉन्च होणार OnePlus चा दमदार स्मार्टफोन

OnePlus च्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार कंपनी लवकरच भारतात एक आपला नवीन हँडसेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. OnePlus 13T हा स्मार्टफोन चायना मध्ये लॉन्च झाल्यानंतर लगेचच आपल्या भारतात लॉन्च होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातो. 24 एप्रिलला हा फोन चीनच्या मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे.

Updated on -

OnePlus 13T Latest Update : नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण साऱ्यांनी गुढीपाडव्याचा मोठा सण सेलिब्रेट केला. रामनवमीचा देखील सण संपूर्ण देशात अगदीच उत्साहाने साजरा झाला. आता 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. म्हणजेच आता सर्वत्र सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दरम्यान जर तुम्हाला या सणासुदीच्या काळात नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

विशेषता ज्यांना वन प्लस चा फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की वन प्लस चा एक नवीन हँडसेट बाजारात लॉन्च होणार आहे. बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षित OnePlus 13T हा स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट कंपनीकडून नुकतीच कन्फर्म करण्यात आली आहे.

खरे तर अलीकडेच कंपनीने या मोबाईलचे डिझाईन आणि लूक कन्फर्म केले होते आणि आता याची लॉन्चिंग डेट देखील फिक्स झाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा स्मार्टफोन चायना मार्केटमध्ये कधी लॉन्च होणार, भारतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये कधी लॉन्च होणार आहे? तसेच याचे फीचर्स कसे राहणार याचाच संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कधी लाँच होणार हँडसेट ?

मिळालेल्या माहितीनुसार वन प्लस कंपनी सुरुवातीला हा स्मार्टफोन फक्त चायना च्या मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनच्या मार्केटमध्ये या महिन्यातच म्हणजेच एप्रिल 2025 मध्येच हा हँडसेट लॉन्च होऊ शकतो. 24 एप्रिल 2025 रोजी चीनमध्ये वन प्लस कंपनीच्या माध्यमातून OnePlus 13T हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार असल्याची माहिती कंपनीच्या माध्यमातून हाती आली आहे.

यामुळे ग्राहकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची आतुरता आता संपणार आहे. महत्त्वाची बाब अशी की चीन मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर लवकरच हा स्मार्टफोन ग्लोबल आणि इंडिया मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर हा हँडसेट 2025 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये म्हणजेच जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या सहा महिन्यांच्या काळात हा हँडसेट भारतात तसेच ग्लोबल मार्केटमध्ये कधीही लॉन्च केला जाऊ शकतो.

सध्या हा स्मार्टफोन चायना मध्ये लॉन्च होणार असून कंपनीने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वेइबो द्वारे या फोनच्या लाँचिंगची पुष्टी सुद्धा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनसाठी प्री रीजर्वेशन सुद्धा सुरू करण्यात आले आहे. आता आपण या स्मार्टफोनचे फीचर्स कसे आहेत याबाबत माहिती पाहूयात.

कसे आहेत फिचर्स ?

OnePlus 13T या स्मार्टफोनची वनप्लस चाहत्यांना मोठी आतुरता आहे. मात्र या चाहत्यांची आतुरता आता संपणार आहे कारण की येत्या काही महिन्यांनी हा फोन आपल्या भारतात सुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनच्या फीचर्स बाबत तसेच याच्या स्पेसिफिकेशन्स बाबत बोलायचं झालं तर यामध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. या फोनचा डिस्प्ले उच्च रिफ्रेश रेटसह ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

यामुळे हा स्मार्टफोन वापरताना ग्राहकांना खरंच मज्जा येईल. या स्मार्टफोन मध्ये बॅटरी चांगली मोठी राहणार आहे, मिळालेल्या माहितीनुसार या हँडसेटमध्ये 6000 एमएएचची बॅटरी असेल. याशिवाय फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप सुद्धा असेल आणि हा कॅमेरा सेटअप चौकोनी राहणार आहे, जो की या स्मार्टफोनला एक प्रीमियम लुक देणार आहे.

फोनच्या कॅमेरा बाबत बोलायचं झालं तर याच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय, 50 एमपीचा टेलिफोटो कॅमेरा दिला जाईल. फोनचा कॅमेरा 2x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करणार आहे. OnePlus 13 प्रमाणेच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Elte प्रोसेसर दिले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये आपल्याला आयफोनची झलक पाहायला मिळू शकते.

या फोनमध्ये कंपनी आयफोन 16 सिरीजप्रमाणे एक अतिरिक्त बटण देणार असे बोलले जात आहे. तसेच, कंपनीने या आधीच्या मॉडेलमध्ये देण्यात आलेले अलर्ट स्लायडर बटण काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनमध्ये मेटॅलिक बटणे वापरली जातील, म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये दिली जाणारी बटणे चांगल्या क्वालिटीची राहणार आहे. नक्कीच हा फोन दिसायला जेवढा भारी दिसेल तेवढाच हा मजबूत सुद्धा राहणार आहे.

या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 16GB DDR5X रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज मिळणार असा एक अंदाज आहे. तसेच, या फोनमध्ये 80W सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्ट राहणार आहे. हा अँड्रॉइड फोन ऑक्सिजन ओएस या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करणार आहे.

नक्कीच हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांना एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण याची किंमत किती असणार आणि भारतात हा फोन कधीपर्यंत लॉन्च होणार ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe