पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 17 एप्रिलला ‘या’ 9 पर्यटन स्थळांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट अन तिकीट पहा…

हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, सुवर्ण मंदिर, माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेने एका विशेष गाडीचे नियोजन केले आहे. ही विशेष गाडी तब्बल 5000 km ची यात्रा करणार असून या यात्रेदरम्यान तुम्हाला अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळांना भेटी देता येणार आहेत. ही गाडी उद्या 17 एप्रिल रोजी पुण्यावरून सुटणार आहे आणि दहा दिवसांनी परत पुण्यात येणार आहे. दरम्यान आज आपण याच विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि या ट्रिपची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना सुवर्ण मंदिर, ऋषिकेश, हरिद्वार, माता वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी जायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खासच राहणार आहे. कारण की, राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमधून अर्थातच पुण्यामधून एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. आय आर सी टी सी कडून उत्तर भारत देवभूमी यात्रा गुरुकृपा विशेष एक्सप्रेस ट्रेन पुण्यावरून चालवली जाणार आहे. दरम्यान, आज आपण याच विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत. तसेच या गाडीमधून प्रवास करण्यासाठी किती तिकीट लागणार ? याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहेत डिटेल्स

मिळालेल्या माहितीनुसार उद्या अर्थातच 17 एप्रिल 2025 रोजी ही विशेष गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उद्या पुणे रेल्वे स्थानकावरून सुरू होणारी ही यात्रा तब्बल पाच हजार किलोमीटर लांबीची राहणार असून या यात्रेदरम्यान प्रवाशांना, भाविकांना हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, वैष्णोदेवी, मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देता येणार आहेत.

ही गाडी उद्या म्हणजे 17 तारखेला पुण्यावरून सुटेल आणि दहा दिवसांनी म्हणजे 27 तारखेला ही गाडी पुन्हा पुण्यात येणार आहे. या गाडीमध्ये एकूण 750 लोक बसू शकतात म्हणजेच गाडीची आसन क्षमता 750 लोकांची आहे आणि तिकीट बुकिंग बाबत बोलायचं झालं तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य म्हणजे जो आधी येईल त्याला प्राधान्य दिले जाईल या तत्त्वावर या गाडीचे तिकीट बुकिंग होणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी या विशेष गाडी बाबत अधिकची माहिती देताना असे सांगितले की इच्छुकांना या गाडीमधून जर प्रवास करायचा असेल तर पुणे लोणावळा कर्जत कल्याण वसई रोड वापी सुरत आणि बडोदा या रेल्वेस्थानकावरून या गाडीमध्ये एन्ट्री मिळणार आहे. या गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी चहा नाश्ता दिला जाणार आहे सोबतच दुपारचे आणि रात्रीचे जेवण देखील मिळणार आहे मात्र सर्व जेवण हे शाकाहारी असेल. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांना राहण्याची सुद्धा व्यवस्था करून दिली जाणार आहे. पर्यटन स्थळी उतरल्यानंतर सुद्धा वाहनाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यावेळी एक गाईड सुद्धा राहणार आहे.

काय-काय पाहता येणार ?

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या पाच हजार किलोमीटरच्या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक देवी देवतांचे दर्शन घेता येणार आहे. या यात्रेत प्रवाशांना हरिद्वार मध्ये ऋषिकेश, हर की पौडी आणि गंगा आरती, अमृतसर मध्ये वाघा बॉर्डर आणि सुवर्ण मंदिर पाहता येणार आहे. कटरा मध्ये गेल्यानंतर माता वैष्णोदेवीचे दर्शन घेता येणार आहे. मथुरा मध्ये गेल्यानंतर वृंदावनात जाता येईल आणि त्यासोबतच श्रीकृष्ण जन्मभूमीचे सुद्धा दर्शन होणार आहे. आग्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ताजमहल पाहायला मिळणार आहे.

तिकीट किती असणार?

या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना द्वितीय श्रेणी (टू टिअर ) करीता 41 हजार 530 रुपये प्रति प्रवासी इतके तिकीट लागणार आहे. तृतीय श्रेणी थ्री टियर मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 33 हजार 880 रुपये प्रति प्रवासी इतके तिकीट लागणार आहे आणि सामान्य श्रेणी शयनयानमधून प्रवास करण्यासाठी अठरा हजार 230 रुपये प्रति प्रवासी इतके तिकीट लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe