Maharashtra News : भारताचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा एक महाराष्ट्रीयन बनणार ! महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर येत आहे. देशाचे पुढील CJI हे सुद्धा महाराष्ट्रीयन राहणार आहेत. खरेतर, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना मे 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्या आधीच खन्ना यांनी पुढील सर न्यायाधीश पदासाठी एका महाराष्ट्रीयन व्यक्तीचे नाव सुचवले असल्याची बातमी समोर आली आहे. म्हणजेच भारताच्या सरन्यायाधीश पदी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन व्यक्ती विराजमान होणार हे फिक्स झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खन्ना यांनी बुधवारी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे बी. आर गवई जे की महाराष्ट्रातील आहेत त्यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर याचीच चर्चा सुरु आहे. भारताचे सरन्यायाधीश म्हणून गवई यांची नियुक्ती झाल्यास महाराष्ट्राच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ही महाराष्ट्रासाठी खरंच एका अभिमानाची बाब राहील.

11 नोव्हेंबर 2024 रोजी खन्ना यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. ते निवृत्त झालेत की मग गवई या पदाचा कार्यभार अधिकृत रित्या स्वीकारतील अशी शक्यता आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार, विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीची शिफारस करत असतात. साधारणता विद्यमान सरन्यायाधीशांच्या माध्यमातून अशा व्यक्तींची शिफारस होते जे की सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असतात.
दरम्यान याच परंपरेनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी कायदा मंत्रालयाने न्यायमूर्ती खन्ना यांना याबाबत विनंती केली होती. त्यांना त्यांच्या उत्तराधिकारीची निवड करण्याची औपचारिक विनंती करण्यात आली होती. दरम्यान मंत्रालयाच्या याच विनंतीनुसार आता खन्ना यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र गवई यांच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती समोर आली आहे. आता जर न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती झाली तर ते भारताचे 52 वे सरन्यायाधीश बनणार आहेत आणि ही महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची बाब राहील.
विशेष बाब अशी की गवई कधी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार याबाबतही एक माहिती हाती आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार 14 मे 2025 रोजी गवई देशाचे CJI म्हणून शपथ घेणार आहेत, म्हणजेच वर्तमान सीजीआय खन्ना निवृत्त झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गवई CJI म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती हाती आलेली नसली तरी देखील याबाबतचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता गवई हेच पुढील सीजीआय बनतील आणि ते 14 मे लाच शपथ घेण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे गवई हे सुद्धा खन्ना यांच्याप्रमाणेच फक्त सहा महिनेच या पदावर राहतील. कारण की ते सुद्धा नोव्हेंबर 2025 मध्ये निवृत्त होत आहेत. म्हणजेच या वर्षात देशाला तब्बल 2 नवे CJI लाभतील. गवई यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला आहे. त्यांचे वडील दिवंगत आर. एस. गवई हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल होते.