मारुतीच्या ‘या’ लोकप्रिय 5 सीटर कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली ! 28 किमीच मायलेज अन बरच काही….

मारुती सुझुकीच्या एका लोकप्रिय कारच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स या कंपनीच्या लोकप्रिय कारच्या विक्रीत गेल्या मार्च महिन्याच्या म्हणजेच मार्च 2024 च्या तुलनेत मार्च 2025 मध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. दरम्यान आज आपण या लोकप्रिय कारच्या विक्रीत घट का आली आणि याचे फीचर्स नेमके कसे आहेत याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maruti Suzuki Car : भारतीय कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा एक वेगळा फॅन बेस आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. टाटा प्रमाणेच मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना देखील ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. मारुती सुझुकी कंपनी बाबत बोलायचं झालं तर हे देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातील काही गाड्या टॉप सेलिंग आहेत. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही देखील काही महिन्यांपूर्वी कंपनीची एक टॉप सेलिंग कार होती.

मात्र अलीकडे या मॉडेलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या काळात कंपनीने 21,461 युनिट विकल्या होत्या. मात्र यावर्षी ही संख्या 13,669 पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यासोबत तुलना केली असता 7792 वाहनांची घसरण झाली आहे. म्हणजेच या मॉडेलच्या विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 36.31 टक्क्यांची घट झालेली आहे.

जाणकार लोकांनी या कारच्या विक्रीमध्ये घट होण्यामागे घटेमागे अनेक कारणं सांगितली आहेत.पण यातील सर्वात मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे फ्रॉन्क्सच्या किमतीत झालेली वाढ. मित्रांनो, सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 7.52 लाखांपासून सुरू होते. म्हणजेच या मॉडेलच्या बेस व्हेरिएंटची किंमत 7.52 लाख इतकी आहे आणि टॉप व्हेरिएंटचा विचार केला असता याची किंमत 9.43 लाखांपर्यंत जाते.

दरम्यान, या किमतीत ग्राहकांना इतर अनेक पर्याय मिळत आहेत अन म्हणूनच फ्रॉन्क्सची मागणी कमी झाली असल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदवले आहे.शिवाय, फ्रॉन्क्सच्या नवीन मॉडेलच्या लॉन्चची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि यामुळेच अनेक ग्राहक नव्या मॉडेलच्या सुद्धा प्रतीक्षेत आहेत. या कारणामुळे ही या मॉडेलच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे.

ही कार स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान, पेट्रोल व सीएनजी पर्यायांसह ग्राहकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही, कंपनीची ही एक हॉट सेलिंग कार असल्याने या कारच्या विक्रीतील ही मोठी घट कंपनीसाठी चिंतेची बाब आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही. दरम्यान आता आपण या कारचे भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन थोडक्यात समजून घेणार आहोत.

कसे आहेत फिचर्स  ?

मारुती सुझुकीच्या या लोकप्रिय कारमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे की ग्राहकांना आकर्षित करतात. या कारमध्ये कंपनीने एक लिटर पेट्रोल इंजिन दिलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यात स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी या रेंजमध्ये असे तंत्रज्ञान पुरवून या कारने चांगलेच हवा केली होती. या कारमध्ये दिलेले हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. याशिवाय ग्राहकांना इंजिनचे दुसरेही पर्याय मिळतात.

28.51 किलोमीटरचे मायलेज

या कारमध्ये 1.2 लिटर के-सिरीज अॅडव्हान्स्ड ड्युअल जेट आणि ड्युअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन देखील देण्यात आले आहे.हे इंजन 5 स्पीड मॅन्युअल व 6 स्पीड एजीएस गिअरबॉक्ससह येते. यामुळे वाहनचालकांना ही कार चालवताना एक चांगला अनुभव येतो.

विशेष बाब अशी की पेट्रोल डिझेल तर आहेच पण ही कार सीएनजीमध्ये देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे या गाडीला ग्राहकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळाला. या गाडीचे मायलेज सुद्धा फारच उत्तम आहे. या कारचे सीएनजी वेरियंट तब्बल 28.51 किलोमीटरचे मायलेज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe