विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शाळा तासाभराआधीच सोडल्या जाणार, यात तुमची पण शाळा आहे का ? वाचा….

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नाशिक महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, या संबंधित सकाळ सत्रांच्या शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Schools : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40° च्या पुढे गेले आहेत. उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अशीच स्थिती आहे.

यामुळे मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसतोय. दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचे महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. दरम्यान याच निर्देशाच्या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला.

महापालिकेच्या आखत्यारित येणाऱ्या शाळांच्या वेळेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच अर्थातच 15 एप्रिल 2025 पासून हा बदल लागू करण्यात आला आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नाशिक महापालिकेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात 83 शाळा भरवल्या जात आहेत. तसेच महापालिकेच्या आखत्यारित येणाऱ्या 18 शाळा दुपारच्या सत्रात भरविल्या जातात.

दरम्यान सकाळच्या सत्रातील ज्या शाळा असतात त्या सकाळी सव्वा सात वाजता भरतात आणि दुपारी सव्वा बारा वाजता या शाळा सोडल्या जातात. मात्र, आता या सकाळच्या सत्रात भरवल्या जाणाऱ्या शाळांच्या वेळात मोठा बदल झाला आहे.

या शाळा सकाळी सव्वा सात वाजताच भरतील मात्र दुपारी सव्वा बारा ऐवजी आता सव्वा अकरा वाजताच या शाळा सोडल्या जाणार आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या काही ठिकाणच्या दुपार सत्रातील शाळांच्या वेळा आता जशा आहेत तशाच राहणार आहेत.

महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळा एकाच इमारतीत भरतात. अशा या परिस्थितीत जर सकाळ आणि दुपार सत्रातील शाळा एकाच वेळी सकाळ सत्रात भरवल्या गेल्यात तर वर्ग खोल्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होणे शक्य नाही.

आणि म्हणूनच महापालिका अंतर्गत येणाऱ्या काही ठिकाणच्या दुपार सत्रातील शाळांच्या वेळा कायम राहणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेचे शिक्षण विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांनी महापालिकेच्या या निर्णयाची माहिती देताना असे सांगितले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार सकाळ सत्रात भरवल्या जाणाऱ्या शाळांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात भरवल्या जाणाऱ्या शाळा आता एक तास आधीच सोडल्या जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News