CM फडणवीस यांचा ‘हा’ ड्रीम महामार्ग प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी खुला होणार ! मुंबई ते नाशिक प्रवास फक्त 3 तासात, वाचा डिटेल्स

मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम महामार्ग प्रोजेक्ट लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

Updated on -

Maharashtra New Expressway : 1 मे 2025 रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला एक मोठी भेट मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई ते नाशिक हा प्रवास अवघ्या तीन तासात करता येणे शक्य होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा एक मे ला सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग. या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता.

यानंतर जुलै 2023 मध्ये या महामार्गाचा 80 किलोमीटर लांबीचा शिर्डी ते भरविर हा तपास सुरू झाला. 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि आता एक मे 2025 रोजी इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब अशी की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरे तर हा महामार्ग प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केला जात असून या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक पूर्वतयारी देखील सुरू झाली आहे.

आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला असून एक मे 2025 रोजी या महामार्गाचा बाकी राहिलेला 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

इगतपुरी ते आमणे, भिवंडी हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नाशिक हा प्रवास फक्त तीन तासात शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच यामुळे मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठता येणार आहे.

दरम्यान या टप्याचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून, आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग बाबत बोलायचं झालं तर हा सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी आहे अन याची रुंदी 120 मीटर इतकी आहे.

या महामार्गावरून वाहने तब्बल 150 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकणार आहेत. तसेच या महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास सुद्धा विकसित करण्यात आले आहेत.

या महामार्गावर जुळे बोगदे देखील तयार करण्यात आले आहेत. हा महामार्ग पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकात्मिक विकासाला या महामार्ग प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe