मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी बातमी ! लवकरच जपानमधील 2 ट्रेन भारतात दाखल होणार, ‘या’ तारखेला सुरु होणार मार्ग

भारतात लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर चालवली जाणार आहे. दरम्यान देशातील याच पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्प बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

Published on -

Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतीय रेल्वे मध्ये गेल्या काही वर्षात मोठे अमूलाग्र बदल झाले आहेत. रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी रेल्वे कडून वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसांनी देशात बुलेट ट्रेन देखील सुरू होणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद या मार्गांवर देशातील पहिले बुलेट ट्रेन सुरु होणार असून सध्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान आता याच बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक नवीन माहिती हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील ई 5 आणि ई 3 बुलेट ट्रेन लवकरच भारतात येणार आहेत. खरे तर बुलेट ट्रेन चे ई 10 मॉडेल भारतात आणि जपानमध्ये एकाच वेळी ट्रॅकवर आणल्या जाणार असून यासाठी सध्या विचार सुरू आहे.

मात्र भारतात त्याआधीच बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग सुरू होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर चा काही भाग 2027 मध्ये सुरू होणार आहे. ऑगस्ट 2027 मध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑपरेशन साठी सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑपरेशनसाठी सुरू झाल्यानंतर ई 5 आणि ई 3 बुलेट ट्रेनचा वापर केला जाणारा आहे. दरम्यान या दोन्ही ट्रेन मधून जो डेटा मिळेल त्याचाच वापर ई 10 मॉडेलमध्ये केला जाईल आणि ही ट्रेन अपग्रेड होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेनमध्ये सामान ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा असेल आणि यामध्ये खराब हवामानात तग धरण्याची क्षमता सुद्धा राहणार आहे. दरम्यान आता आपण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्प नेमका कसा असणार याबाबत माहिती पाहूयात.

कसा असणार प्रकल्प ?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर हा देशातील पहिलाच बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याची लांबी 508 किमी इतकी राहणार आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे या प्रकल्पाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत याचे 360 किमीचे काम पूर्ण झाले असून 2027 मध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. या कॉरीडॉरचा 352 किमीचा मार्ग हा गुजरात राज्यात आहे. याच्या 8 स्टेशनपैकी 6 स्टेशन तयार सुद्धा झाले आहेत.

याच्या 272 किलोमीटरमध्ये वायडक्ट सुद्धा तयार झाला आहे. तसेच, 113 किमीचे ट्रॅक बेड सुद्धा तयार आहेत. या मार्गावर तेरा ठिकाणी नदीवर पूल तयार होणार आहेत जे की नुकतेच पूर्ण झाले आहेत. या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत महाराष्ट्रातील 156 किमी ट्रॅकचे 19% काम झाले आहे.

सध्या या प्रकल्पाअंतर्गत 3 एलिव्हेटेड स्टेशन, 7 डोंगरी बोगदे, समुद्राखालील 21 किमी लांब बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नक्कीच हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe