स्मार्टफोन बाबत बाबा वेंगाच ते भाकीत जशाच्या तस खरं ठरतय ! मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी आत्ताच व्हावे सावध, नाहीतर….

स्मार्टफोन हा आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सोशल मीडियामुळे स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांचा स्क्रीन टाईम वाढतोय आणि यामुळे अनेकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. पण असं म्हणतात की स्मार्टफोनबाबत बाबा वेंगा यांनी आधीच एक भविष्यवाणी केली होती. दरम्यान आता आपण बाबा वेंगा यांनी याबाबत काय भविष्यवाणी केली होती याविषयी माहिती पाहणार आहोत.

Published on -

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा आणि त्यांच्या भविष्यवाणी बद्दल तुम्ही नक्कीच केव्हा ना केव्हा ऐकलं असेल किंवा यावर चर्चा केली असेल. बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीत खरी ठरली असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. त्यांनी वर्तवलेली अनेक भाकिते आतापर्यंत सत्यात उतरली असल्याचा दावा होतो. दरम्यान बाबा वेंगाने स्मार्टफोन बाबत देखील एक मोठ भाकीत गेल्या काही दशकांपूर्वी वर्तवलं होतं.

म्हणजे जेव्हा स्मार्टफोनचा थांगपत्ता पण लागलेला नव्हता तेव्हा बाबा वेंगा यांनी स्मार्टफोन बाबत भाकीत वर्तवलं होतं. महत्त्वाचे म्हणजे बाबा वेंगा यांनी स्मार्टफोन बाबत जे भाकीत वर्तवलं होतं ते आता खरं होतंय अशा काही चर्चा सध्या सुरू आहेत.

दरम्यान आता आपण बाबा वेंगा यांनी स्मार्टफोन बाबत नेमकं काय म्हटलं होतं आणि आता तसच काहीस घडतय का? याबाबत सध्या काय दावा केला जातोय याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे ते भाकीत?

असं म्हणतात की, बाबा वेंगा यांनी 9/11 मध्ये अमेरिकेत दहशतवादी हल्ला होणार असे भाकीत वर्तवले होते जे की खरे ठरले. याशिवाय 2025 मध्ये म्यानमार या देशात भूकंप येणार असेही भाकीत त्यांनी वर्तवले होते. यासोबतच बाबा वेंगा यांनी जगात 2025 पासून अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मिती संकटं येतील अस आपल्या भाकितांमध्ये सांगितल आहे.

एवढेच नाही तर 3797 मध्ये आपला पृथ्वी ग्रह नष्ट होऊ शकतो असे सुद्धा भाकीत त्यांनी वर्तवले आहे. दरम्यान त्यांच्या या भाकितांची सातत्याने चर्चा होत राहते. अनेक जण त्यांची भविष्यवाणी खरी ठरते असे मानतात तर काहीजण त्यांचे भाकीत गूढ काव्यात असते अन म्हणूनच त्यांच्या भविष्यवाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि लोक त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार ही भविष्यवाणी मोडून सांगतात असं म्हणतात.

म्हणजेच त्यांच्या भविष्यवाणीवर समाजात दोन मतप्रवाह पाहायला मिळतात. मात्र असे असले तरी त्यांनी स्मार्टफोनविषयी गेल्या काही दशकांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी मनुष्य एका तळहाता एवढ्या एका काचसदृश्य यंत्रावर दिवसभर चिटकलेले दिसतील असे भाकीत सांगितले होते.

तसेच 2022 पर्यंत तर अनेकजण चालता, बोलता, खाता-पिता ही स्क्रीन डोळ्यासमोर धरतील, लोक जणूकाही या यंत्राचे गुलाम होतील, असे सांगितले होते. दरम्यान बाबा वेंगाची ही भविष्यवाणी आता खरी ठरल्याचा दावा केला जातोय. स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरली असल्याचे अनेकांचे मत आहे.

यामुळे सध्या त्यांच्या या भविष्यवाणी बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत. बाबा वेंगा यांनी लोकांना स्मार्टफोनचे व्यसन लागेल, यामुळे समाजावर मोठे दुष्परिणाम होतील, यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येईल असे भाकीत वर्तवले असल्याचा दावा काही जण करतात. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता बाबा वेंगा यांची हीच भविष्यवाणी खरी ठरली असल्याची चर्चा आता सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe