बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 12वी नंतर ‘हे’ कोर्सेस करा आणि लाखो रुपयांचे पॅकेज मिळवा

पुढल्या महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये बारावी आणि दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. सुरुवातीला बारावीचा आणि नंतर दहावीचा निकाल लागेल. पण जर बारावी झाली आता पुढे काय असा जर तुमचा प्रश्न असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी 12 वी नंतर कोणते कोर्सेस करायला हवेत याबाबतची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

Published on -

Courses After 12th : सध्या सगळीकडे दहावी आणि बारावीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे यामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मीडिया रिपोर्ट नुसार पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर मग दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते कोर्सेस केले पाहिजेत जेणेकरून त्यांना लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरीं मिळेल याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

12वी नंतर हे कोर्सेस करा

बिजनेस आणि मॅनेजमेंट : बारावीनंतर कोणता कोर्स करायचा असा जर तुमचा प्रश्न असेल आणि तुमची मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी बिझनेस आणि मॅनेजमेंटची फिल्ड उत्तम राहणार आहे.

बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी BBA, PGDM किंवा मार्केटिंग/फायनान्स सारखे कोर्सेस केले तर त्यांना चांगल्या एमएनसी मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी लागू शकते. मात्र विद्यार्थ्यांनी हे कोर्स नामांकित विद्यापीठातून तसेच शैक्षणिक संस्थांमधून करायला हवेत जेणेकरून त्यांना चांगल्या कंपनीत सहज नोकरी मिळू शकेल.

हार्डवेअर आणि नेटवर्किंग : ज्या विद्यार्थ्यांना आयटी कंपनीमध्ये काम करायची इच्छा असेल पण इंजिनिअरिंगला जाणं शक्य होणार नाही असे वाटते. आणि आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंग ऐवजी दुसरे कोर्सेस शोधात असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधला डिप्लोमा एक बेस्ट पर्याय ठरू शकणार आहे.

हा डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहजतेने आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या कोर्सेसच्या मदतीने आणि संगणक, नेटवर्क सेटअप, रिपेअरिंग अशा स्किल्स शिकून विद्यार्थी आयटी कंपनीत नोकरी मिळू शकतो. या फिल्डमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI : सध्या संपूर्ण जगात AI बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील असे बोलले जात आहे. कदाचित ही गोष्ट खरी असेल पण यामुळे काही नोकऱ्या जनरेट सुद्धा होणार आहेत. खरेतर हे भविष्याचं संपूर्ण तंत्रज्ञान आहे ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही.

यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता विद्यार्थ्यांनी या फील्डमध्ये करिअर करायला काही हरकत नाही. विद्यार्थ्यांनी बारावीनंतर या क्षेत्रात डिप्लोमा केल्यास त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. विद्यार्थी या क्षेत्रातील डिप्लोमा करून मशीन लर्निंग, NLP, आणि ऑटोमेशनच्या जगात चांगली संधी मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe