Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआय ने नुकत्याच देशातील एका बड्या बँकेवर कठोर कारवाई केली होती. आरबीआय ने देशातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कलर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून नुकताच रद्द करण्यात आला असून यामुळे संबंधित बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.
पण कलर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना नियमानुसार पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकणार आहे. दरम्यान, कलर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे लायसन्स रद्द केल्यानंतर आरबीआय कडून आता देशातील तीन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आरबीआयकडून आतापर्यंत चार बँकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान आता आपण आरबीआय ने कोणत्या तीन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
या बँकांवर केली दंडात्मक कारवाई !
मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या 3 बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. महत्वाचे बाब अशी की यासंदर्भात आरबीआय कडून प्रसिद्धी पत्रक देखील जारी करण्यात आले आहे.
सदर प्रसिद्ध पत्रकार नुसार पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक सेवेसंदर्भातील काही मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असल्याने या बँकेवर दंडात्मक कारवाई झाली आहे. आरबीआयने या बँकेला 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आयडीएफसी फर्स्ट या बँकेबाबत बोलायचं झालं तर आरबीआय ने या बँकेला 38.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या केवायसी नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून या बँकेवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर सुद्धा दंडात्मक कारवाई केलेली आहे.
आरबीआय ने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की कर्ज आणि अॅडव्हान्सेस संदर्भातील मार्गदर्शक सूचना, वैधानिक बंधने आणि काही आवश्यक धोरणांचं पालन केलं नसल्याने कोटक महिंद्रा बँकेवर दंडात्मक कारवाई झालेली आहे. कोटक महिंद्रा बँकेवर तब्बल 61.4 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.