मुंबईला मिळणार आणखी एक नवा उड्डाणपूल ! मे महिन्यात सुरु होणार नवीन फ्लायओव्हर

देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई प्रमाणेच मुंबई उपनगरांमध्ये देखील मोठी वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न देखील सुरु आहेत.

Published on -

Mumbai New Flyover : देशाची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच एका नव्या उड्डाणपुलाची भेट मिळणार आहे. मुंबई शहरातील एका नव्या उड्डाणपूलाचे पुढील महिन्यात लोकार्पण होणार असल्याची बातमी समोर येत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कल्याण-शिळ रोडवरील महत्त्वाच्या पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन पुढल्या महिन्यात सुरु होणार आहेत. मे महिन्यापासून या दोन लेन प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या नव्या उड्डाणपुलामुळे दिवा-पनवेल रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज आपण याबाबतचे अपडेट नेमके काय आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

काय आहेत डिटेल्स ?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कल्याण-शिळ रोडवरील महत्त्वाच्या पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन पुढील महिन्यात सुरु होणार असून याच प्रकल्पाची नुकतीच पाहणी करण्यात आली आहे.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी अर्थातच 17 एप्रिल 2025 रोजी या कामाची पाहणी केली आहे. यावेळी या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी पुलाचे उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुद्धा दिली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, मे अखेरीस दोन लेनचे काम पूर्ण होऊन त्या वाहतुकीसाठी खुल्या होणार असा अंदाज आहे. या भागातील जाणकार लोक सांगतात की, पलावा जंक्शन परिसरात सध्या वाहतुकीचा मोठा बोजा पडत आहे.

मात्र, या भागातील वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. उड्डाणपुलाच्या नवीन दोन लेन सुरू झाल्यानंतर येथे सहा लेनवरून वाहतूक सुरळीत होणार आहे.

दरम्यान या प्रकल्पाच्या आणखी दोन लेनचे काम पुढील टप्प्यात सुरू राहणार असून त्यासाठी स्वतंत्र नियोजन सुद्धा करण्यात आले असल्याची माहिती संबंधित जाणकारांकडून देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या पुलाच्या माध्यमातून कल्याण-शिळ मार्गावरील प्रवास वेळेत होणार असून, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

नक्कीच हा प्रकल्प कल्याण करांच्या सेवेत आला तर कल्याण मधील महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे आणि यामुळे या भागातील, परिसरातील वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe