Navi Mumbai Cidco Lottery 2025 : मुंबई, नवी मुंबई ठाणे या भागात मोक्याच्या ठिकाणी आपले घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. दरम्यान जर तुमचेही असे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना नवी मुंबई मध्ये आपले हक्काचे घर बनवायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.
खरे तर नवी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महत्त्वाची बाब अशी की, पुढेही नवी मुंबईमध्ये घराच्या किमती अशाच वाढत राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अनेक जण लवकरात लवकर नवी मुंबईत आपल्या हक्काचा आशियाना शोधत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवी मुंबईत घर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सिडको एक चांगली सुवर्णसंधी घेऊन येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिडको लवकरच नवी मुंबई मधील हजारो घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यामध्ये सिडको आपल्या विक्री न झालेल्या घरांसह नव्याने बांधण्यात आलेल्या घरांचा समावेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
सिडको या आपल्या आगामी लॉटरीत तब्बल 12,000 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असून यामुळे नवी मुंबईत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याचा दावा जाणकारांकडून केला जातोय.
सिडको 12000 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार असून या अनुषंगाने प्राधिकरणाकडून चाचपणी सुद्धा सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे सिडको कडून ही लॉटरी 30 एप्रिल 2025 रोजी अर्थातच अक्षय तृतीयाच्या दिवशीच जाहीर होऊ शकते असा एक अंदाज आहे.
नव्या लॉटरीतील घरांच्या किमती किती असणार
सिडको कडून नव्या लॉटरी मध्ये समाविष्ट होणाऱ्या घरांच्या किमती किती असणार याबाबत अजून कोणतीच माहिती हाती आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये या घरांच्या किमती 25 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे.
सिडकोच्या या घरांच्या किमती 25 लाख रुपयांपासून ते 90 लाख रुपयांपर्यंत असू शकतात. या लॉटरीमध्ये ईडब्ल्यूएस, एलआयजी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
कोणत्या भागातील घरांचा समावेश राहणार?
सिडकोच्या आगामी लॉटरी मध्ये समाविष्ट असणारी घरे नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, तळोजा, घारघर परिसरात असतील. त्यासोबतच बामणडोंगरी, मानसरोवर, खारकोपर, वाशी ट्रक टर्मिनस, पनवेल बस स्टँड परिसरातील असतील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
नक्कीच नवी मुंबई मध्ये मोक्याच्या ठिकाणी घर हवे असेल तर ही लॉटरी तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे.