Virar – Palghar News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वेचे अनेक प्रकल्प गेल्या 10-15 वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्त्यांचे आणि रेल्वेची प्रकल्प पूर्ण झाली आहेत आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा सुद्धा मिळतोय.
दुसरीकडे आता मुंबईकरांसाठी आणि मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांसाठी जलमार्ग देखील विकसित होत आहेत जेणेकरून नागरिकांचा प्रवास आणखी वेगवान होईल. अशातच विरार ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई, विरार आणि मिरा रोड, भाईंदर शहरांदरम्यान रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर आता विरार ते खारवाडेश्री (सफाळे) या जलमार्गावरील बहुप्रतीक्षित रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ आज झालाय. आज 19 एप्रिल 2025 रोजी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे.
यामुळे विरार ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. सध्या पालघर येथील सफाळे ते वसई विरार दरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना जवळपास दीड ते दोन तासांचा वेळ लागतो.
पण रो रो सेवा सुरू झाल्यानंतर समुद्र मार्गाने हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटात कापले जाणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता आपण या रो-रो सेवेबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत डिटेल्स?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेद्वारे आजपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या विरार ते सफाळे हा प्रवास रस्ते मार्गाने करायचा असेल तर दीड तासांचा वेळ लागतो आणि रेल्वे मार्गाने जवळपास एका तासाचा वेळ लागतो.
पण, आजपासून या दोन्ही ठिकाणादरम्यान प्रवास करण्यासाठी जलमार्गाचा पर्याय उपलब्ध होत आहे अन म्हणूनच हा एक ते दीड तासांचा प्रवास आता केवळ १५ मिनिटांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. ही सेवा सुरू झाल्याने या परिसरातील नागरिकांची डोकेदुखी कमी होणार आहे.
या नव्या प्रवासाच्या पर्यायामुळे इंधन बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणमुक्त प्रवास अनुभवता येणार असून यामुळे नागरिकांच्या माध्यमातून या रोरो सेवेचे स्वागत केले जात आहे. खरेतर, विरारमध्ये नारंगी जेट्टी विकसित करण्यात आली आहे आणि सफाळेमध्ये खारवाडेश्री जेट्टी तयार झाली आहे. दरम्यान आता याच दरम्यान रो-रो सेवा सुरु होईल.
संबंधित जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या जलमार्गावरील फेरीबोटमध्ये एका वेळेस १०० प्रवासी आणि ३३ वाहने वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असल्याने प्रायोगिक तत्त्वावरच काही महिन्यांसाठी तिकीट दर निश्चित करण्यात येणार आहेत. नक्कीच या नव्या वाहतुकीच्या पर्यायामुळे या परिसरातील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे.