पुढील महिन्यात महाराष्ट्राला मिळणार एका नव्या महामार्गाची भेट ! 2 मे 2025 रोजी ‘या’ एक्सप्रेस वे चे लोकार्पण होणार, पीएम मोदी करणार उद्घाटन

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राज्यातील आणखी एका महत्त्वाच्या रस्ते विकासाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून याचे लोकार्पण पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे लोकार्पण स्वतः पीएम मोदी करणार आहेत.

Published on -

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रातील रस्त्यांचे आणि रेल्वेचे नेटवर्क मजबूत व्हावे यासाठी शासन आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जातोय.

मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून तीन टप्प्यात हा भाग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. तसेच या महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्णपणे बांधून तयार झाला आहे.

यामुळे, आता हा शेवटचा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण कधी ?

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पुढील महिन्यात अगदी सुरुवातीलाच होणार आहे. खरे तर, गेल्या सहा-सात दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे 2025 रोजी होणार असे म्हटले जात होते.

मात्र आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण दोन मे 2025 रोजी होणार आणि याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अशी माहिती दिली असल्याचा दावा केला जातोय.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता, याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले होते.

यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. पुढे 2024 मध्ये या महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.

अशा तऱ्हेने आतापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग सर्वसामान्यांसाठी खुला झाला असून दोन मे 2025 रोजी या महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणार असून याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत.

कसा आहे शेवटचा टप्पा?

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने (ठाणे) फारच आव्हानात्मक होते. या 76 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कामगारांना मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागली.

कारण म्हणजे शेवटच्या टप्प्याच्या 76 किलोमीटर पैकी 11 किलोमीटरचा रस्ता भुयारी आहे. तसेच या महामार्ग प्रकल्पातील सर्वात लांब बोगदा हा 8 किलोमीटरचा आहे. दरम्यान याच बोगद्याचे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना अन कामगारांना मोठी मेहनत घ्यावी लागली आहे.

या भुयारी रस्त्याबाबत बोलायचं झालं तर हा रस्ता घाट सेक्शनला बायपास करण्यासाठी इगतपुरीजवळ तयार करण्यात आला आहे. महत्वाचे बाब म्हणजे या प्रकल्पांतर्गत विकसित झालेला हा भुयारी मार्ग जगातील सर्वात लांब आणि रुंद भुयारी रस्त्यांपैकी एक असल्याचा दावा सुद्धा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

तसेच या महामार्गाचा जवळपास 11 किलोमीटरचा रस्ता एलिव्हेटेड आहे. शेवटच्या टप्प्यातील याच कामामुळे आता प्रवाशांना कसारा घाटाच्या वळणदार रस्त्याऐवजी पुलावरून प्रवास करता येणार आहे.

नक्कीच समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा मोठा आव्हानात्मक होता आणि हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास खऱ्या अर्थाने आठ तासात शक्य होणार आहे तसेच मुंबई ते नाशिक हा प्रवास फक्त तीन तासात होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe