लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार की नाही ? नीलम गोऱ्हे म्हणतात मी….

गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपयांचा लाभ देऊ असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले. मात्र अजून या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आणि आता याच संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी खूप महत्त्वाचे भाष्य केले आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडली बहना योजनेला तेथील महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मध्यप्रदेश मध्ये विधानसभा आणि लोकसभेत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. हीच बाब विचारात घेऊन गेल्या शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.

या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि याचा लाभ जुलै महिन्यापासून दिला जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत. दरम्यान, ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे.

या योजनेमुळे महायुती सरकारला राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले बहुमत मिळाले आहे. खरेतर, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आमचे सरकार आले तर 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल असे सांगितले गेले होते.

पण आता महायुती सरकार स्थापित होऊन बराच काळ उलटला असले तरी देखील 2100 रुपयांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कमालीची नाराजी आहे. हीच गोष्ट पाहता आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी याच बाबत मोठी माहिती दिली आहे.

नीलम गोऱ्हे म्हणतात…

खरेतर, सांगलीतील दैवज्ञ भवनमध्ये काल 18 एप्रिल 2025 रोजी जिल्हा शिवसेना (शिंदे) महिला आघाडीच्यावतीने एका महिला मेळाव्याचे आयोजन झाले. या कार्यक्रमाला डॉ. नीलम गोर्‍हे उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे भाष्य केले. त्या म्हणाल्यात की, लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी त्या स्वत: प्रयत्न करणार आहेत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

विरोधकांच्या माध्यमातून ही योजना लवकरच सरकारकडून बंद होईल असे म्हटले जात आहे. तसेच अनेकांकडून सरकारने 2100 रुपयांच्या आश्वासन दिले होते मग त्या आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान याच साऱ्या राजकीय चर्चा आणि गदारोळाच्या पार्श्वभूमी डॉक्टर नीलम गोरे यांनी असे सांगितले की, लाडकी बहीण योजनेला महिलांंना चांगला फायदा होतोय. या योजनेच्या मदतीने राज्यातील अनेक महिलांनी बचत गट काढून लहान, लहान उद्योग सुद्धा सुरू केले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे महिलांना बँकांनीही चांगले सहकार्य केले आहे. म्हणून आता आपण लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

गोऱ्हे यांनी दिलेले हे आश्वासन लाखो लाडक्या बहिणींसाठी आशादायी ठरणार आहे. तथापी, आता आगामी काळात लाडक्या बहिणींना खरंच 2100 रुपये प्रति महिना असा लाभ मिळणार का ही गोष्ट पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe