Samsung Galaxy M56 5G : AI फीचर्स, मोठी बॅटरी आणि बरंच काही!Samsung चा नवीन फोन खरेदी करा फक्त 27,999 रुपयांत

Published on -

Samsung Galaxy M56 5G : सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M56 5G लाँच केला आहे. कंपनीच्या गॅलेक्सी M सिरीजमधील हा स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि स्लीम प्रोफाइलसह येतो. या फोनची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये AI आधारित इमेज एडिटिंग टूल्स, फास्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Galaxy M56 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले दिला आहे, जो FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या मोठ्या आणि उच्च दर्जाच्या डिस्प्लेमुळे व्हिडिओ बघणे आणि गेमिंगचा अनुभव अधिक चांगला होतो. स्मार्टफोन Exynos 1480 प्रोसेसरवर कार्य करतो आणि यात 8GB RAM आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.

कॅमेरा व AI फीचर्स-

या डिव्हाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. याशिवाय, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी समोर HDR सपोर्टसह 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमधील खास बाब म्हणजे यामध्ये दिलेले AI आधारित इमेजिंग फिचर्स. यात ऑब्जेक्ट इरेजर, इमेज क्लिपर आणि एडिट सजेशन्स यांसारखी टूल्स देण्यात आली आहेत. यामुळे फोटो एडिटिंगची प्रक्रिया खूपच सुलभ होते. तसेच, या फोनमध्ये नाईटोग्राफी सपोर्टसह 10-बिट HDR मध्ये 4K रिझोल्यूशनवर 30FPS व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो.

बॅटरी क्षमता-

Galaxy M56 5G Android 15 वर आधारित One UI 7 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. सॅमसंगने या डिव्हाइसला 6 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 45W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन देण्यात आले आहे, जे स्क्रॅच आणि डॅमेजपासून फोनचे संरक्षण करते.

Galaxy M56 5G ची विक्री 23 एप्रिलपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर आणि अमेझॉनवर सुरू होणार आहे. सुरुवातीच्या ऑफरमध्ये HDFC बँकेच्या कार्डधारकांना 3000 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळू शकते. एकंदर, Samsung Galaxy M56 5G हा एक असा स्मार्टफोन आहे जो कॅमेरा, डिझाइन आणि परफॉर्मन्स यांमध्ये संतुलन साधतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe