पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन कमी पडली ! अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये पुन्हा भूसंपादन होणार, प्रस्ताव पहा….

पुणे रिंग रोड प्रकल्पच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी अतिरिक्त जमीन लागणार असून आज आपण कोण कोणत्या गावांमध्ये अतिरिक्त जमिनीची गरज निर्माण झाली आहे याचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या बाह्य रिंग रोड प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, याच राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

खरंतर, या प्रकल्पाच्या संदर्भात नुकतीच एक आढावा बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न झाली आहे. दरम्यान या आढावा बैठकीत रिंग रोड प्रकल्पासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आणखी चालना मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही आढावा बैठक ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत पार पडली, तसेच या बैठकीत खेड, हवेली तालुक्यांतील उपविभागीय अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. आता आपण या बैठकीत नेमकं काय झालं? याची माहिती जाणून घेऊया.

काय झालं बैठकीत ?

खरे तर, रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पूर्ण केले जात आहे. तसेच सध्या या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रिंग रोडचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून याचे प्रत्यक्षात बांधकाम सुद्धा सुरू होत आहे.

कारण संबंधित कंपन्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे पूर्व रिंग रोडच्या 265 हेक्टरपैकी केवळ 30 हेक्टर जमिनीचे संपादन शिल्लक राहिलेले आहे. म्हणजेच पूर्व रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेले आहे.

येत्या काही दिवसांनी हे सुद्धा काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तथापि आढावा बैठकीत पूर्व रिंग रोडचे बाकी राहिलेले संपादन 25 एप्रिलपर्यंत पूर्ण करून पुढील पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समजते.

रिंग रोड प्रकल्पासाठी आणखी जमीन लागणार

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या अशा पुणे रिंग रोड प्रकल्प साठी आणखी जमीन लागणार आहे. खरे तर, रिंग रोडच्या आजूबाजूला सर्विस रोड तयार केले जाणार आहेत आणि विविध सोयी सुविधा विकसित होणार आहेत.

दरम्यान याच सर्विस रोड साठी आणि सुविधा विकसित करण्यासाठी अतिरिक्त जमिनीची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने पूर्व आणि पश्चिम भागातील जवळपास 32 गावांमध्ये अतिरिक्त जमिनीचे संपादन करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पूर्व भागातील 10 आणि पश्चिम भागातील 22 अशा एकूण 32 गावांमध्ये अतिरिक्त जमिनीची गरज भासणार असून या संबंधित गावांमधील अतिरिक्त जमिनी संपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर सुद्धा करण्यात आला आहे. दरम्यान याबाबतची अधिसूचना लवकरच जाहीर होईल अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

दुसरीकडे पुणे रिंग रोडचे अलाइनमेंट काही ठिकाणी बदलले गेले होते. पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावात रिंग रोडच अलायंमेंट म्हणजे आखणी बदलण्यात आली असून या अनुषंगाने या संबंधित गावांमध्ये जमिनीचे संपादन देखील आता लवकरच पूर्ण होणार आहे. बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.

खरे तर सुरुवातीला या दोन्ही गावांमध्ये जमीन मालकांकडून मोठा विरोध झाला होता मात्र आता समाधानकारक मोबदला मंजूर करण्यात आला असल्याने शेतकरी जमीन देण्यास तयार झाले आहेत. आता आपण पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी सर्विस रोड आणि सुविधा विकसित करण्यासाठी कोणकोणत्या गावांमध्ये अतिरिक्त जमीन लागणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

या गावांमध्ये अतिरिक्त जमिनीची गरज

1)पश्चिम रिंगरोड
मावळ तालुका : चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली
मुळशी तालुका : मुठे, घोटावडे, कातवडी
भोर तालुका : खोपी
हवेली तालुका : रहाटवडे, बहुली

2)पूर्व रिंगरोड
नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे
हवेली तालुका : लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती
पुरंदर तालुका : पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे
खेड तालुका : खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे
भोर तालुका : शिवरे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe