प्रतीक्षा संपली! Nothing Phone 3 कधी होणार लाँच? काय असतील स्पेसिफिकेशन्स?; वाचा A टू Z माहिती

Published on -

Nothing Phone 3 : नथिंग कंपनीने त्यांच्या पारदर्शक डिझाइन आणि ग्लिफ इंटरफेसमुळे अल्पावधीतच बाजारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता कंपनीचा नवा स्मार्टफोन “नथिंग फोन 3” लाँच होण्यासाठी सज्ज झाला असून, याबाबतची माहिती थेट कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी दिली आहे.

कार्ल पेई यांनी अलीकडेच एक्स प्लॅटफॉर्मवर “Ask Me Anything” सेशन दरम्यान एका युजरला उत्तर देताना सांगितले की नथिंग फोन 3 वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केला जाईल. म्हणजेच, हा फोन जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ही माहिती अधिकृत असून, ग्राहकांमध्ये या फोनबद्दल उत्सुकता वाढली आहे.

डिझाइनबद्दल अपडेट-

या फोनबाबत अद्याप तपशील पूर्णपणे समोर आलेले नसले तरी, याच्या डिझाइनमध्ये पुन्हा एकदा ट्रान्सपेरेंट रिअर पॅनल आणि ग्लिफ इंटरफेसचा समावेश असेल, अशी शक्यता आहे. तसेच यामध्ये एआय-सक्षम फीचर्स असण्याचीही जोरदार चर्चा आहे. मागील मॉडेलप्रमाणे यामध्येही प्रीमियम स्पेसिफिकेशन्स असतील.

नथिंग फोन 2 हे मॉडेल 11 जुलै 2023 रोजी सादर झाले होते. त्यापूर्वी नथिंग फोन 1 चे अनावरण 21 जुलै 2022 ला करण्यात आले होते. त्यामुळे कंपनीचा लाँच वेळ सातत्याने जुलै महिन्यात असतो, हे लक्षात घेता नथिंग फोन 3 सुद्धा याच कालावधीत लाँच होईल, अशी शक्यता आहे.

स्पेसिफिकेशन्स-

नथिंग फोन 2 मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्याय उपलब्ध होता. या फोनमध्ये 6.7 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले होता जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. कॅमेरा विभागात ड्युअल 50MP रिअर कॅमेरा सेटअप आणि 32MP फ्रंट कॅमेरा होता. बॅटरी 4700mAh क्षमतेची असून 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

नथिंग फोन 3 बाबत अद्याप संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाहीर झालेल्या नसल्या तरी, मागील मॉडेलच्या तुलनेत अधिक प्रगत फीचर्स आणि एआय क्षमतांनी युक्त हा स्मार्टफोन असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये आधीच या फोनबाबत उत्सुकता आहे आणि अधिकृत लाँच डेटची वाट पाहिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe