महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पिकनिकला जाणार आहात का? अहो मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. विशेषता ज्यांना महाबळेश्वरला पिकनिकला जायचं असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की महाबळेश्वरला पिकनिकला जाणाऱ्यांसाठी प्रशासनाकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Mahabaleshwar Tourism Festival : महाबळेश्वरला पिकनिकला जाणार आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे? महाबळेश्वरला पिकनिकला जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

या ठिकाणी संपूर्ण देशभरातील लोक पिकनिक साठी येतात. महाबळेश्वरला उन्हाळ्यामध्ये येणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वरला पिकनिकला जाणारा साल तर तुमच्यासाठी प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून काही दिवस टोल घेतला जाणार नाही. खरंतर यंदा 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वर या फेमस पिकनिक पाठवा महापर्यटन महोत्सव साजरा होणार आहे आणि याच अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी या महा पर्यटन महोत्सवाच्या कालावधीत महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफी जाहीर केली आहे. म्हणजेच या काळात जर तुम्ही महाबळेश्वरला गेलात तर तुम्हाला टोल द्यावा लागणार नाही.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना टोल आकारला जातो, मात्र या विशेष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टोल माफ करण्यात आला आहे. या ठिकाणी जाताना पाचगणी किंवा मग पुढे एका टप्प्यावर बाहेरून येणाऱ्या वाहनांकडून आणि प्रवाशांकडून टोल वसूल केला जात असतो.

हा टोल माणसी तत्त्वावर वसूल केला जातो. मात्र दोन तीन आणि चार मे 2025 रोजी महाबळेश्वर येथे संपन्न होणाऱ्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांकडून टोल वसूल होणार नाहीये.

जेवढे दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे म्हणजेच तीन दिवस टोल वसूल केला जाणार नाही. मात्र पाच मे 2025 पासून पुन्हा एकदा टोल वसूल होणार आहे. आता आपण हा महोत्सव नेमका कसा आहे याबाबत माहिती पाहूयात.

कसा राहणार महोत्सव?

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात अनेक कार्यक्रम होणार आहेत. या तीन दिवसांच्या काळात येथे सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यप्रदर्शन, लोककला सादरीकरण आणि साहसी खेळांची रेलचेल असणार आहे.

यामुळे पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये जाऊन मनमुराद आनंद लुटता येणार आहे. उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी जर तुमचाही पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर नक्कीच तुम्ही या काळात महाबळेश्वर व्हिजिट करायला हवे.

खरे तर राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना 26 एप्रिल पासून सुट्ट्या लागणार आहेत आणि त्यानंतर उन्हाळी पिकनिकला जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे जर तुमचाही मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर पिकनिकचा प्लॅन असेल तर महाबळेश्वर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल.

दरम्यान या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्थातच 3 मे रोजी साबणे रस्त्यावर भव्य सांस्कृतिक मिरवणूक आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहेत.

4 मे रोजी महोत्सवाचा समारोप होईल, यावेळी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमा आयोजित केले जाणार आहेत आणि याच रंगारंग कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी महाबळेश्वर या ठिकाणी होणाऱ्या या महोत्सवात कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर शंभरहून अधिक तंबू उभारण्यात येणार आहेत.

वेण्णा तलावात नौकानयन आणि साहसी खेळांचीही मजा घेता येणार आहे. एकंदरीत हा महोत्सव पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. या काळात अनेक जण पिकनिक साठी महाबळेश्वरला भेट देणार आहेत. असे असतानाच प्रशासनाने आता पर्यटकांना टोलमाफीचा निर्णय घेऊन मोठी भेट दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News