सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगात सरकार ‘या’ 35 पदावर करणार नवीन नियुक्त्या

आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Published on -

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाचे चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे लवकरच आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार असून याचे अध्यक्ष यांची आणि सदस्यांची नियुक्ती होऊन औपचारिक रित्या याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. कारण की केंद्रातील मोदी सरकारने या अनुषंगाने आता हालचाली वाढवल्या आहेत.

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या दिशेने नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने नव्या आठव्या वेतन आयोगासाठी 35 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही नव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने महत्त्वाची प्रक्रिया आहे.

यावरून सरकार लवकरच नव्या वेतन आयोगाची रचना आणि कार्य औपचारिक रित्या सुरू करण्याची तयारी करत असल्याचे समजतं आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. यानंतर आता आठव्या वेतन आयोगासाठी 35 पदांवर नवीन नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणजेच नव्या वेतन आयोगाच्या हालचाली आता तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, ही सर्व नियुक्ती प्रतिनियुक्तीच्या आधारावर केली जाणार असून, या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ आयोगाच्या स्थापनेपासून तो बंद होईपर्यंत असणार अशी माहिती जाणकार लोकांकडून यावेळी समोर आली आहे.

तसेच, या नियुक्त्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) मार्गदर्शक तत्वांनुसार केल्या जाणार आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की या नियुक्त्या करण्यासाठी संबंधित विभागांकडून पात्र अधिकाऱ्यांची नावे सुद्धा मागवण्यात आली आहेत.

यावरून आता असा अंदाज लावला जात आहे की नव्या आठव्या वेतन आयोगाची रचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेत आठवा वेतन आयोगाचा लाभ या ठिकाणी मिळू शकणार आहे.

केव्हापासून लागू होणार नवा वेतन आयोग?

सध्याचा सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला. यासाठीच्या समितीची स्थापना मात्र 2014 मध्येच करण्यात आली होती. आठव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू शकतो.

कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला होता आणि त्यानंतर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे. हा इतिहास पाहिला असता आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. आठव्या वेतन आयोगात अनेक गोष्टी बदलतील.

हा नवा आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ, महागाई भत्त्याचा मूळ पगारात समावेश, तसेच HRA व प्रवास भत्त्यात सुधारणा अशा अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नव्या वेतन आयोगात सध्या 2.57 असलेला फिटमेंट फॅक्टर 2.85 पर्यंत वाढू शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे.

मात्र असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. या नव्या वेतन आयोगाचा देशभरातील 47.85 लाख केंद्रीय कर्मचारी व 68.62 लाख पेन्शनधारक यांना फायदा होणार असून संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News