Nagar Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील रोल प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. कारण की सरकारकडून राज्यात एक नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार असून या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
हा नवा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान हा नवा रेल्वे मार्ग तयार होणार असून या नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता मिळाली आहे.

खरंतर, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असून यामुळे अहिल्यानगर ते संभाजीनगर यादरम्यान रेल्वे मार्ग असायला हवा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.
यासाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला जात होता. दरम्यान, हाच पाठपुरावा आता यशस्वी झाला असून नवीन रेल्वे मार्ग आता लवकरच नगरकरांना उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. दरम्यान सर्वेक्षण पूर्ण झाल्याने आता या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल म्हणजे डी पी आर सुद्धा येत्या काही दिवसांनी रेडी होणार आहे.
येत्या महिनाभरात या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार अशी माहिती समोर आली आहे आहे. स्वतः केंद्रीय वित्त राज्यमंत्री आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. अशा परिस्थितीत आता आपण हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असेल नवा रेल्वे मार्ग ?
खरेतर, दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. कराड हे छत्रपती संभाजी नगर येथे आले होते. यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर प्रदीर्घ बैठक सुद्धा झाली. या बैठकीत अनेक रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा झाली.
तसेच, यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण करत छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची सविस्तर माहिती दिली. खरेतर, नव्या रेल्वेमार्गासाठीच्या एक नाही तर 3 सर्वेक्षण करण्यात आले होते अन यातील तिसरा सर्वे अंतिम करण्यात आला असल्याचे सांगितले गेले.
या प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर याची लांबी जवळपास 85 किलोमीटर इतकी राहणार असून यासाठी 3238 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या नव्या रेल्वे मार्गासाठी 640 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.
या रेल्वे मार्गावर एकूण नऊ स्थानके राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, शरणापूर, अंबेगाव, येसगाव, गंगापूर, देवगड, नेवासा, उस्थल दुमला, शनि शिंगणापूर, आणि वांभोरी ही स्थानके या मार्गांवर असतील.
मात्र यामध्ये रांजणगाव स्थानक सुद्धा घ्यावे अशी सुचना डॉ. कराड यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे आता रांजणगाव हे स्टेशन सुद्धा यात सामाविष्ट होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा डी पी आर 15 मे 2025 पर्यंत अंतिम केला जाणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपीआर तयार झाल्यानंतर मंजूरी घेतली जाईल. अन मग नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची बैठक होउन मंजूरी घेतली जाईल अन त्यानंतर खऱ्या अर्थाने निविदा प्रक्रियेला सुरवात होणार अशी माहिती जाणकार लोकांकडून यावेळी समोर आली आहे.