महाराष्ट्रातील 17 लाख राज्य कर्मचारी आणि 12 लाख पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! महागाई भत्ता वाढ झाली निश्चित, किती वाढेल DA ?

महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य कर्मचारी आणि बारा लाख पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता वाढीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार याबाबत मोठी माहिती हाती आली आहे.

Published on -

7th Pay Commission DA Hike : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला.

दरवर्षीप्रमाणे केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

आधी त्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र आता यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली असून हा महागाई भत्ता 55% इतका करण्यात आला असून ही वाढ एक जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे.

मात्र मार्च महिन्याच्या पगारांसोबत याचा लाभ मिळाला असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा देण्यात आली आहे.

अशी सारी परिस्थिती असतानाच आता राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना किती टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार ? याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे.

किती टक्के वाढणार DA

महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि 12 लाख पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ही महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित करण्यात आली आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय मात्र यामध्ये आता पुन्हा एकदा दोन टक्के वाढ होणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर जाणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणारी ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजेच जेव्हा पण राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा प्रत्यक्षात लाभ मिळेल तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा द्यावी लागणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय येत्या काही दिवसांनी जारी होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News