सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 20 एप्रिल 2025 रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 10 ग्रॅम सोन्याचे रेट चेक करा

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल होतोय. सोन्याच्या किमती गेल्या दहा दिवसांच्या काळात विक्रमी वाढल्या आहेत. सोन आता लवकरच एक लाखाचा टप्पा गाठू शकत अस चित्र तयार होत आहे. दरम्यान आज 20 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किंमती कशा आहेत याच बाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

Published on -

Gold Price Today : सोन खरेदी करण्यासाठी सराफा बाजाराच्या दिशेने जाताय? मग थोडं थांबा आणि आजची बातमी पूर्ण वाचा. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये दोन दिवस फक्त सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. ती पण घसरण फारच कमी होती.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अर्थातच 14 एप्रिल ला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला सोन्याच्या किमतीत थोडी घसरन झाली होती. नाहीतर गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमती सतत वाढत राहिल्या आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 10 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 9,338 रुपये प्रति ग्रॅम असा होता. 11 एप्रिल ला सोन्याच्या किमतीत आणखी वाढ झाली या दिवशी सोन्याचा भाव 9540 रुपये ग्रॅम एवढा नमूद करण्यात आला.

12 तारखेला यामध्ये आणखी वाढ झाली, या दिवशी सोन्याचा भाव 9567 रुपयांवर पोहोचला. 13 एप्रिल 2025 रोजी मात्र सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात. 14 एप्रिल ला यामध्ये घसरण झाली, डॉक्टर आंबेडकर जयंती दिनी सोन्याची किंमत 9551 रुपये एवढी होती.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला ही किंमत 9518 पर्यंत खाली आली. त्यानंतर 16 एप्रिल ला यामध्ये पुन्हा 99 रुपयांची वाढ झाली, या दिवशी सोन्याची किंमत 9617 वर पोहोचली. 17 एप्रिल ला सोन्याची किंमत 9731 रुपये प्रति ग्राम एवढी झाली.

तसेच, एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 9758 रुपये प्रति ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. काल 19 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत स्थिर राहिली म्हणजेच 9758 रुपये प्रति ग्राम एवढीच राहिली. आता आपण 20 एप्रिल 2025 रोजी चे सोन्याचे दर चेक करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, ठाणे येथील सोन्याचा भाव

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, ठाणे इथे आज 20 एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव – 89 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा भाव – 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा भाव – 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्राम असा नमूद झाला.

नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर येथील सोन्याचा भाव

नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर येथे आज 20 एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव – 89 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा भाव – 97 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा भाव – 73 हजार 220 रुपये प्रति दहा ग्राम असा नमूद करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News