रेल्वे प्रवाशांनो प्रवास करतांना मोबाईल चोरीला गेला तरी काळजी नको ! आता ‘या’ सरकारी ऍप्लीकेशनमुळे चोरीला गेलेला मोबाईल मिळणार परत

तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का अहो मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल फोनची चोरीचे प्रमाण वाढत असल्याने आता रेल्वे कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. दैनंदिन कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. मात्र रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

विशेषता सणासुदीच्या काळात, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढते. अशा गर्दीच्या वेळी मग अनेकदा चोरीच्या घटना सुद्धा घडतात. रेल्वे प्रवासात अनेकांचे मोबाईल फोन चोरीला जातात. आपल्यापैकी अनेकांना रेल्वे प्रवाशांमध्ये प्रवास करताना असा अनुभव आला असेल.

रेल्वेने प्रवास करताना मोबाईल फोन चोरीला गेला की साहजिकच संबंधित प्रवाशांची मोठी धावपळ होते. मोबाईल फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर काय करावे हे अनेकांना सुचत नाही, याची तक्रार कुठे करावी, कुठे जावं, कुणाला सांगावं? याबाबत सुचत नाही आणि यामुळे मग तो व्यक्ती हवालदिन होतो.

कारण म्हणजे मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर फक्त हजारो रुपयांचं नुकसानचं नाही, तर त्यातले आपले नंबर, बँकिंग डिटेल्स, फोन पे, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, फोटो, बँकेची माहिती सुद्धा दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतात. यामुळे आर्थिक फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या प्रायव्हसीचा प्रश्न सुद्धा उद्भवतो.

मोबाईल फोन चोरीला गेल्यानंतर आपल्या अनेक पर्सनल गोष्टी दुसऱ्याला माहिती पडू शकतात आणि यामुळे वित्तीय आणि सोबतच आपल्या प्रायव्हसीचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. मात्र आता रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल फोन चोरीला गेला किंवा हरवला तर रेल्वे प्रवाशांना फारशी काळजी करण्याची गरज भासणार नाही.

कारण की प्रवाशांच्या मदतीला आता एक नवीन सुविधा आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे आणि केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग (DoT) यांनी एकत्र येऊन मोबाईल फोन चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आता रेल्वेचं ‘रेल मदद’ हे ॲप आणि सरकारचे मोबाईल ट्रॅक करणारं ‘संचार साथी’ हे पोर्टल एकमेकांशी जोडण्यात आलं आहे. रेल मदद एप्लीकेशन मुळात रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी बनवण्यात आले आहे आणि आता हे ॲप्लिकेशन मोबाईल ट्रॅक करणाऱ्या संचार साथी अँप्लिकेशन सोबत जोडले गेले आहे.

यामुळे आता रेल्वे प्रवाशांचा मोबाईल ट्रेनमध्ये चोरीला गेला किंवा हरवला तर ताबडतोब ॲक्शन घेता येणे शक्य होणार आहे. रेल्वे प्रवाशांना हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल या एप्लीकेशन च्या मदतीने परत मिळवता येऊ शकतो तसेच त्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते. रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आरपीएफ चे जवान सुद्धा या कामी मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता आपण ही सुविधा नेमकी कशी काम करणार याचा संदर्भात माहिती पाहणार आहोत.

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे मोबाईल हरवल्यानंतर दुसऱ्या एखाद्या मोबाईलमध्ये तुम्हाला ‘रेल मदद’ ॲप डाउनलोड करायचे आहे. मग हे ॲप्लिकेशन ओपन करून तुम्हाला मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवायची आहे.

एप्लीकेशन वर तक्रार नोंदवली गेली की ती आपोआप ‘संचार साथी’ पोर्टलवर पाठवली जाणार आहे. आता ‘संचार साथी’ पोर्टलवर तक्रार पोहोचली की चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल नंबर तात्काळ ब्लॉक केला जाणार आहे. यामुळे तुमच्या आर्थिक आणि प्रायव्हेट गोष्टी सेक्युअर होणार आहेत.

मोबाईल नंबर ब्लॉक केला म्हणजे तुमच्या सिम कार्डचा गैरवापर होणार नाही तसेच याच्या मदतीने चोर तुमच्या बँकेचे अकाउंट सुद्धा ॲक्सेस करणार नाहित. महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा फोन नक्की कुठे आहे, हे शोधण्याचं कामही या एप्लीकेशन मधूनच होणार आहे. मोबाईल फोन कुठे आहे समजलं की मग त्यानंतर आरपीएफ जवान सुद्धा या कामात मदत करतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe