सासू सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला पण अधिकार मिळतो का ? उच्च न्यायालयाने दिलाय असा निकाल

आपल्या देशात संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात भांडणे होतात, वादविवाद होतात. यामुळे कुटुंबात कलहाचे वातावरण तयार होते. खरे तर भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेला आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलगा आणि मुलगी समान वाटेकरी असतात आणि ते वडिलांच्या संपत्तीवर दावा करू शकतात. अशा परिस्थितीत मुलीच्या नवऱ्याला म्हणजे जावयाला सासरच्या संपत्तीत अधिकार मिळतो का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Published on -

Property Rights : भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत. हे कायदे धर्मानुसार तयार झालेले आहेत. दरम्यान आपल्या देशात संपत्ती विषयक मोठ्या प्रमाणात वाद विवाद असतात. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक कायद्यांमधील एका महत्त्वाच्या तरतुदीची माहिती जाणून घेणार आहोत.

सासू-सासर्‍याच्या संपत्तीत जावयाला अधिकार मिळतो का? याबाबत भारतीय कायद्यात काय तरतूद आहे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. खरंतर अलीकडेच उत्तर प्रदेशातील अलीगडमधून एक खळबळ जनक प्रकरण समोर आलं.

अलिगडमध्ये सासूने होणाऱ्या जावायासोबत पळ काढलाय अन आता ती आपल्या होणाऱ्या जावयासोबत लग्न करू इच्छित असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सध्या या संपूर्ण प्रकरणाची सबंध देशभरात चर्चा सुरू आहे. ज्या पुरुषासोबत लेकीचं लग्न होणार होतं, त्याच पुरुषासोबत महिलेने पळ काढला असल्याने अनेकांकडून या प्रकरणात आपापले मत मांडले जात आहे.

पण, हे प्रकरण समोर आल्यानंतर आता सासरच्या प्रॉपर्टीत जावयाला हक्क मिळतो का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हणून आज आपण याबाबत भारतीय कायद्यात नेमकी काय तरतूद आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सासरच्या संपत्तीत जावयाला अधिकार मिळतो का?

याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू उत्तराधिकार कायदा (HSA) 1956 मध्ये कोणते लोक वर्ग-1 चे उत्तराधिकारी असतात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या कायद्यानुसार पत्नी, मुलगा, मुलगी, मृत मुलगा, मृत मुलाचा मुलगा, मृत मुलाची पत्नी, मृत मुलाचा मुलगा आणि मुलाच्या पत्नीची मुले हे मालमत्तेचे उत्तराधिकारी होऊ शकतात. म्हणजेच मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत असला तरी देखील सासरच्या संपत्तीत जावयाचा अधिकार नसतो.

दरम्यान, एका खटल्याची सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणात असा निर्णय दिला होता की, जावयाला त्याच्या सासू आणि सासऱ्याच्या संपत्तीवर म्हणजेच सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार मिळत नाही.

जरी जावयाने घर बांधण्यासाठी सासरच्या लोकांना पैसे दिले असले तरी त्याला सासरच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळू शकत नाही. न्यायालयाने या महत्त्वाच्या प्रकरणात असे म्हटले होते की, मुलीच्या पतीला सासरच्या घरात राहण्याचा फक्त तोपर्यंतच हक्क आहे जोपर्यंत सासरचे लोक त्याला अशी परवानगी देतात.

या प्रकरणात माननीय न्यायालयाने असे सुद्धा स्पष्ट केले आहे की, जावई लग्नानंतर कुटुंबाचा सदस्य झाला तरी सुद्धा त्याला सासऱ्यांच्या संपत्तीवर कोणताच अधिकार मिळत नाही. यावरून जावई सासरच्या संपत्तीवर अधिकार सांगू शकत नाही, सासरच्या संपत्तीवर दावा करू शकत नाही हे स्पष्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News