मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात ‘या’ मार्गावर धावणार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस, पुण्यालाही मिळणार नवीन रेल्वेगाडी

मुंबई आणि पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. मुंबई आणि पुण्यावरून नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. मुंबईला लवकरच नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच अमृत भारत एक्सप्रेस मिळणार आहे. दरम्यान आता आपण मुंबईवरून सुरू होणाऱ्या या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनच्या रूट बाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Mumbai Non AC Vande Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे, येत्या सहा महिन्यात देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसला नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखले जाते.

दरम्यान, ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू होणार आहे. मुंबई ते बिहार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून यामुळे बिहार मधून मुंबईला आणि मुंबईमधून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेल्वेने पुढील 6 महिन्यांत बिहारमध्ये 6 नवीन रेल्वेगाड्या चालवण्याची मोठी घोषणा केलेली आहे. यामध्ये अमृत भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेससह अनेक गाड्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या नवीन गाड्या बिहार ते दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद अशा अनेक वर्दळीच्या मार्गांवर चालवल्या जातील अशी शक्यता असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे.

जाणकारांकडून प्राप्त माहितीनुसार, 2025 च्या शेवटी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होऊ शकते असा एक अंदाज आहे. अजून भारतीय निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही परंतु या काळात बिहारमध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.

अशा परिस्थितीत, निवडणुकीपूर्वी, भारतीय रेल्वे पुढील सहा महिन्यांत अत्याधुनिक सेवांसह अनेक नवीन गाड्या सुरू करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त हाती आले आहे. यामध्ये मुंबई ते बिहार दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा सुद्धा समावेश राहणार आहे.

मुंबईला मिळणार अमृत भारत एक्सप्रेस !

मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून बिहार ते मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बिहारला भेट देतील तेव्हा ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात.

दरम्यान ही नवीन अमृत भारत ट्रेन सहरसा आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर बिहारला या आधी सुद्धा अमृतभारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.

बिहार मधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (ANVT) या मार्गावर धावत आहे. आता या मार्गानंतर, मुंबई ते सहरसा या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून ही बिहारची दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.

तसेच, या वर्षी बिहारची राजधानी पटना आणि नवी दिल्ली दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. एवढेच नाही तर बिहार मधून पुणे, बेंगळुरू, सिकंदराबाद आणि इतर मार्गांवर नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवली जाणार आहे.

विशेष बाब अशी की याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे जर रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News