Home Buying Tips : नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात कामात आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण नवीन घर खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी, नवीन घर खरेदी करताना जर लाखो रुपये वाचवायचे असतील तर कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात ? याची माहिती जाणून घेणार आहोत.
खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, नागरिकीकरण यामुळे प्रॉपर्टी चे रेट्स दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि नागरीकरणामुळे जमीन कमी होत चालली आहे.

यामुळे अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण या महागाईच्या काळात सुद्धा नागरिकांना स्वस्तात घर खरेदी करता येऊ शकते. दरम्यान आता आपण स्वस्तात घर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात याची माहिती जाणून घेऊयात.
घर खरेदी करताना या टिप्स फॉलो करा
घर डेव्हलपर्स कडून खरेदी करावे : तुम्ही जर नवीन घर किंवा फ्लॅट घेण्याच्या तयारीत असाल तर दलालांपासून विशेष सावध रहा. दलालांकडून घर खरेदी करण्याऐवजी तुम्ही जर थेट डेव्हलपर्स कडून म्हणजेच बिल्डर कडून घर खरेदी केले तर तुम्हाला यातून चांगला फायदा होणार आहे.
थेट डेव्हलपर्स कडून किंवा सेलर्सकडून घर खरेदी केल्यास तुम्हाला एजंटला मोठ्या प्रमाणात द्यावे लागणारे कमिशन द्यावे लागणार नाही. यामुळे तुम्हाला योग्य प्रॉपर्टी सुद्धा मिळणार आहे.
घर खरेदीसाठी रोख रक्कम भरा : जर तुमच्याकडे घर खरेदीसाठी संपूर्ण पैसे असतील तर तुम्ही रोख घर खरेदी करायला प्राधान्य द्यायला हवे. होम लोन ऐवजी तुम्ही रोख घर खरेदी केल्यास तुम्हाला डेव्हलपर्स कडून घर कमी किमतीत मिळू शकते. अशावेळी तुम्हाला वाटाघाटी सुद्धा करता येते.
एकाच प्रोजेक्टमध्ये घर खरेदी करा : जर तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी किंवा मित्र परिवारातून कोणी एकाच वेळी घर खरेदी करण्याच्या तयारीत असेल तर तुम्ही एकाच प्रोजेक्टमध्ये घर खरेदी करा.
एकाच वेळी एकापेक्षा अधिक घरांची खरेदी झाली तर तुम्हाला डेव्हलपर्स कडून चांगला फायदा मिळू शकतो. अशावेळी डेव्हलपर्स तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देऊ शकतो.
एरिया मधील घरांच्या किमती चेक करा : तुम्ही ज्या एरियामध्ये घर खरेदी करणार आहात त्या एरिया मधील घरांच्या किमती तुम्ही आवर्जून चेक करायला हव्यात. डेव्हलपर्सकडे जाऊन निगोशिएट करण्याआधी तुम्ही त्या एरियामधील लोकांकडे जाऊन त्या घरातील ऍव्हरेज रेट बाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
अंडर कन्स्ट्रक्शन घर खरेदी करा : जर तुम्हाला पैसे वाचवायचे असेल तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घर खरेदीला प्राधान्य देऊ शकता यामुळे तुम्हाला जास्तीचा फायदा होऊ शकतो. रेडी टू मूव्ह अंडर कन्स्ट्रक्शन घरापेक्षा महाग असते यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन घर खरेदी करून तुम्ही पैसे वाचवू शकता.