लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत, कारण….

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर सध्या या योजनेच्या पात्र महिला एप्रिल महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत मात्र असे असतानाच आता या योजनेच्या बाबत एक नवीन आणि अगदीच धक्कादायक अपडेट समोर आले आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला गेल्या काही दिवसांपासून एप्रिल महिन्याच्या पैशांची वाट पाहत आहेत. अशातच मात्र या योजनेच्या बाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. खरेतर, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मध्य प्रदेश पॅटर्न दिसला.

मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली.

या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. महत्वाचे म्हणजे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देऊ असे आश्वासन सुद्धा दिलेले आहे. अजून 2100 रुपयांच्या बाबत मात्र कोणताच निर्णय झालेला नाही.

दुसरीकडे, आता या योजनेतून लाखो महिलांना बाद करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील विधानसभा निवडणूक आधी ही योजना घोषित करण्यात आली आणि निवडणुका तोंडावर असल्याने ज्यांनी अर्ज केले, त्या महिलांच्या अर्जांची निकषांच्या आधारे काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही.

या योजनेची जून महिन्यात घोषणा झाली आणि त्यावेळी फक्त दोन महिन्यांत राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केलेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी अर्ज केले त्यांची काटेकोर पडताळणी झाली नाही आणि यामुळे अर्ज केलेल्यांपैकी बहूतेकांना याचा लाभ मिळाला.

पण, या योजनेत अपेक्षेपेक्षा जास्त लाभार्थी संख्या तयार झाली आणि यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आणि अन्य योजनांचा बराच निधी या योजनेसाठी वळता करावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची शोधाशोध सुरु झाली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना अपात्र ठरवले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेच्या निकषांनुसार चारचाकी कार असलेल्या आणि एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच यात आढळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे किंवा कमी करण्यात आला आहे.

दरम्यान, आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील 12 लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

तसेच केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ सुद्धा कमी करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना आता दरमहा फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

दुपारीकडे आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधारलिंक करून ‘आयकर’कडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्यस्तरावरुनच घेतला जात असून यात ज्या महिला आढळतील त्यांना सुद्धा योजनेतून बाद केले जाणार आहे. एकंदरीत शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला या योजनेतून बाद होणार आहेत.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2025 या काळातील एकूण नऊ हप्ते देण्यात आले आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या महिन्यांचा लाभ महिलांना मिळाला आहे.

यातील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ 8 मार्च 2025 रोजी म्हणजेच महिला दिनाचे औचित्य साधून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ हा एप्रिलच्या शेवटी दिला जाणार आहे. एप्रिलच्या शेवटी आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा लाभ महिलांना दिला जाऊ शकतो. असे झाल्यास अक्षय तृतीयाचा मोठा सण पात्र महिलांना मोठ्या आनंदात साजरा करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News