पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार 18 विशेष रेल्वेगाड्या

पुणे विभागातून प्रवास करणारे रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून 18 उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात असून यामुळे उन्हाळी हंगामातील गर्दीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय.

Published on -

Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने 18 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे कडून करण्यात आलेल्या या विशेष गाड्यांच्या नियोजनामुळे पुणे विभागातील रवी प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या विशेष गाड्या पुढील अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत चालवल्या जाणार आहेत.

या विशेष गाडीच्या एकूण 576 फेऱ्या होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. दरम्यान आता आपण पुणे विभागातून धावणाऱ्या या उन्हाळी विशेष गाड्या कोणकोणत्या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या बाबत माहिती पाहणार आहोत.

या मार्गावर धावणार उन्हाळी विशेष गाड्या

रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी तत्पर असते. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे कडून विशेष गाड्या सुद्धा सोडल्या जात असतात.

दरम्यान यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी समर स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. पिकनिक साठी तसेच नागरिकांच्या मूळ गावी जाण्यासाठी उन्हाळी काळ हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाची बाब अशी की यावेळी गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर स्वतंत्र कक्ष सुद्धा उभारण्यात येणार आहे. हा कक्ष व्हीआयपी एन्ट्रीजवळ पार्सल विभागाशेजारी असेल अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

दरम्यान या स्वातंत्र कक्षाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुसह्य होतील आणि त्यांच्या अडचणी दूर होतील.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागातून चालवल्या जाणाऱ्या समर स्पेशल ट्रेन्स पुणे-दानापूर, पुणे-गाझीपेठ सिटी, कोल्हापूर-कटियार, दौंड-सोलापूर-कोल्हापूर, पुणे-हरंगुळ आणि पुणे-नागपूर या मार्गांवर धावणार आहेत. साहजिकच या गाड्यांमुळे प्रवाशांना सुट्टीच्या काळात प्रवास करताना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News