Indias EV Market : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत असून, ग्राहक आता परंपरागत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्यांकडे अधिक झुकताना दिसत आहेत. या वाढत्या ट्रेंडमध्ये सर्वाधिक फायदा झाला आहे तो टाटा मोटर्सला. आर्थिक वर्ष 2025 मध्ये टाटाने पुन्हा एकदा आपल्या विक्रमी कामगिरीने संपूर्ण EV मार्केटमध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे. तब्बल 53.52 टक्के बाजार हिस्सा मिळवत टाटाने आपली आघाडी पक्की केली आहे.
टाटाने या काळात एकूण 57,616 इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री केली. या आकड्यांवरून स्पष्ट होते की, टाटा मोटर्स केवळ नावाचीच नव्हे, तर कामगिरीच्या बाबतीतही भारतातील नंबर 1 इलेक्ट्रिक कार कंपनी बनली आहे. ग्राहकांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास ही यशाची मुख्य गुरुकिल्ली ठरली आहे.

एमजी मोटर दुसऱ्या नंबरवर-
दुसऱ्या क्रमांकावर एमजी मोटरने जागा घेतली असून त्यांनी 30,162 युनिट्सची विक्री केली आणि 28.02 टक्के बाजार हिस्सा मिळवला. महिंद्रा थोड्या अंतराने तिसऱ्या स्थानावर राहिली. महिंद्राने 8,182 कार्स विकल्या आणि 7.60 टक्के हिस्सा मिळवला.
याशिवाय, BYD इंडिया 3.16 टक्के बाजारहिस्सा घेऊन चौथ्या क्रमांकावर होती. ह्युंदाई इंडियाने 2,410 कार विक्री करून 2.24 टक्के हिस्सा घेतला आणि पाचव्या क्रमांकावर राहिली. पीसीए ऑटोमोबाईल 1.82 टक्के, बीएमडब्ल्यू इंडिया 1.44 टक्के, मर्सिडीज बेंझ 1.05 टक्के, किआ इंडिया 0.38 टक्के, आणि शेवटी व्होल्वो इंडिया 0.37 टक्के मार्केट शेअरसह क्रमशः सहाव्या ते दहाव्या स्थानावर होत्या.
या आकड्यांवरून स्पष्ट होते की, टाटा मोटर्सने केवळ देशांतर्गत उत्पादनावर भर न देता, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्हता या जोरावर आपली आघाडी राखली आहे. टाटाच्या या यशामुळे भारतीय EV मार्केटमध्ये स्वदेशी उत्पादनाची ताकद पुन्हा सिद्ध झाली आहे.