Kawasaki Eliminator : कावासाकीने आपल्या एलिमिनेटर क्रूझर मोटरसायकलवर या महिन्यात खास सवलत जाहीर केली आहे. बाईकप्रेमींसाठी ही एक चांगली संधी असून, या ऑफरमुळे बाईकची एकूण किंमत कमी झाली आहे.
कंपनीने एलिमिनेटरवर 20,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे. ही सूट ग्राहकांना दोन प्रकारे मिळू शकते. पहिला पर्याय म्हणजे कॅशबॅक व्हाउचर, जो ग्राहक बाईकच्या एक्स-शोरूम किमतीवर रिडीम करू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे 20,000 रुपयांचा मोफत विमा. ही ऑफर मे 2025 च्या अखेरीपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत वैध असेल.

मूळ एक्स-शोरूम किंमत-
कावासाकी एलिमिनेटरची मूळ एक्स-शोरूम किंमत 5,62,000 रुपये आहे. पण या सूटनंतर ग्राहकांना ती बाईक 5,42,000 रुपयांना मिळू शकते. ही बचत ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या राइडिंग गियर, हेल्मेट किंवा इतर अॅक्सेसरीज घेण्यासाठी उपयोगी पडू शकते.
कावासाकी एलिमिनेटर ही कंपनीची भारतातील एकमेव क्रूझर बाईक आहे. तिचा लुक पारंपरिक क्रूझर बाईकसारखा असून, त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या बाईकमध्ये 451 सीसी क्षमतेचे पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 44.7 बीएचपी पॉवर आणि 42.6 एनएम टॉर्क निर्माण करते.
आधुनिक फीचर्स-
ही बाईक सहा-स्पीड गिअरबॉक्ससह येते आणि तिचे इंजिन स्पोर्टी आणि फ्री-रिव्हिंग आहे. त्यामुळे पारंपरिक क्रूझर बाईकच्या तुलनेत एलिमिनेटर अधिक वेगवान आणि प्रतिसादक्षम आहे.
या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रियर शॉक अॅब्झॉर्बर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस 310 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 240 मिमी डिस्क देण्यात आले आहेत.
याशिवाय या बाईकमध्ये ड्युअल चॅनेल ABS, एलईडी हेडलाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रॅक्शन कंट्रोल, राईड मोड्स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यासारखी आधुनिक फीचर्सही आहेत. ही सूट पाहता, बाईक खरेदीचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी कावासाकी एलिमिनेटर ही एक उत्तम निवड ठरू शकते.