Top 5 Affordable Cars :भारतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात कडक तापमानाचा सामना करावा लागतो, आणि अशा काळात कारमध्ये सुद्धा उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे कारच्या आतील जागेल थंड करणारे फीचर्स खूप महत्त्वाचे ठरतात. सध्या भारतात कार खरेदी करताना व्हेंटिलेटेड सीट्स म्हणजेच हवेशीर सीट्स असलेल्या कार्सना पसंती दिली जात आहे. या सीट्स उष्ण हवामानात थंडावा देतात, तसेच थंड हवामानात गरमपणा देखील देतात, त्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो. लांब अंतराच्या प्रवासातही सीटवरून उठल्यावर थकवा जाणवत नाही. चला पाहूया भारतातील अशाच ५ स्वस्त आणि व्हेंटिलेटेड सीट्स असलेल्या कार्स.
टाटा पंच ईव्ही
टाटा मोटर्सची ही SUV तिच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये व्हेंटिलेटेड सीट फीचरसोबत येते. ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV आहे, जी हवेशीर सीटसह उपलब्ध आहे. टाटा पंच ईव्हीमध्ये २५ किलोवॅट आणि ३५ किलोवॅट बॅटरी पॅकचे दोन पर्याय आहेत, जे अनुक्रमे २६५ किमी आणि ३६५ किमी रेंज देतात. एम्पॉवर्ड+ ट्रिममध्ये हे फीचर दिले आहे. याची किंमत ₹12.84 लाख ते ₹14.44 लाख दरम्यान आहे.

टाटा नेक्सन
ही SUV पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिन्ही प्रकारात येते. याचे टॉप-स्पेक फियरलेस + पीएस ट्रिम हवेशीर फ्रंट सीट्ससह येते. या व्हेरियंटची किंमत ₹13.30 लाख ते ₹15.60 लाख पर्यंत आहे. त्याचे इंजिन प्रकार 120 HP ते 100 HP पर्यंत पॉवर निर्माण करतात.
किआ सायरोस
ही नवीन SUV भारतात अलीकडेच लाँच झाली आहे. किआ सायरोसमध्ये पुढील आणि मागील सीट्ससाठीही व्हेंटिलेशनचा पर्याय आहे. HTX आणि HTX+ ट्रिममध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात, ज्यांची किंमत ₹13.30 लाखपासून सुरू होते. तर HTX+ (O) व्हेरियंटमध्ये मागील सीट्ससाठीही हे फीचर दिले आहे, आणि त्याची किंमत ₹17.80 लाख आहे.
किआ सोनेट
या कारच्या GTX+ आणि X-Line या टॉप मॉडेल्समध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स मिळतात. या कारची किंमत ₹14.80 लाखपासून सुरू होते, आणि डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडेलसाठी ₹15.60 लाख पर्यंत जाते.
ह्युंदाई व्हर्ना
ही कार सामान्य आणि टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. तिच्या SX(O) ट्रिममध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्सचा समावेश आहे. या ट्रिमची किंमत ₹14.83 लाख ते ₹17.55 लाख दरम्यान आहे, जी इंजिन पर्यायांनुसार बदलते.
या सर्व कार्स त्यांच्या वर्गात उत्कृष्ट फीचर्ससह सादर केल्या आहेत. उन्हाळ्यात कारचा AC जितका महत्त्वाचा असतो, तितकाच आरामदायक प्रवासासाठी व्हेंटिलेटेड सीट्सचा वापरही फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर या फीचरकडे नक्की लक्ष द्या.