पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील ‘या’ 9 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार, यात तुमच्या भागातील Railway Station आहे का ?

Published on -

Pune Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामुळे देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे रूपडे पूर्णपणे बदलणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की यामध्ये महाराष्ट्रातील शेकडो स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 132 स्थानकांचा समावेश करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने या स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार असून त्यांना वेगवान तसेच आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यातील 132 रेल्वे स्थानकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नऊ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

दरम्यान आता आपण पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास होणार? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या स्थानकांचा पुनर्विकास होणार

खरे तर पुणे जिल्ह्यातील नऊ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून यामध्ये बारामती आकुर्डी चिंचवड दौंड केडगाव अशा अनेक प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अमृत भारत स्टेशन योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या या स्थानकांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे.

यामुळे या संबंधित स्थानकांवर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होतील अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. दरम्यान याच संदर्भात नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.

या बैठकीतून पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार तसेच यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे याबाबतही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड केडगाव बारामती आकुर्डी चिंचवड देहूरोड तळेगाव हडपसर उरळी कांचन या नऊ स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेतून संबंधित रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक वेटिंग लाउंज, फूड कोर्ट्स, हायजिनिक स्वच्छतागृहे, लिफ्ट्स व एक्सलेटर्स विकसित केले जाणार आहेत. तसेच या योजनेतून स्थानकांवर डिजिटल सुविधा आणि अत्याधुनिक दळणवळण व्यवस्था सुद्धा विकसित केली जाणार आहे. यामुळे नागरिकांना फारच आरामदायक प्रवास करता येणार आहे.

किती निधी उपलब्ध झालाय?

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील बारामती रेल्वे स्थानकासाठी 11 कोटी 40 लाख, आकुर्डीसाठी 34 कोटी, चिंचवडसाठी 20 कोटी 40 लाख, देहू रोडसाठी 8 कोटी 50 लाख, तळेगावसाठी 40 कोटी 34 लाख,

हडपसरसाठी 25 कोटी आणि उरुळी कांचनसाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच केडगाव रेल्वे स्थानकासाठी 12 कोटी 50 लाख रुपये आणि दौंड रेल्वे स्थानकासाठी 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News