भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल की बाबर आजम, कोणाला मिळते सर्वाधिक सॅलरी ? गिलच्या पगाराचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल चकित

जगातील नंबर 1 चा फलंदाज शुभमन गिल याला पुन्हा एकदा बीसीसीआय कडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ए कॅटेगिरी मध्ये ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजेच पाकिस्तानचा बाबर आजम याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ए कॅटेगिरी मध्ये ठेवले आहे.

Published on -

Shubhaman Gill Salary : भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचा थरार रंगलेला आहे. भारतातील जवळपास सर्वच स्टार फलंदाज आयपीएल खेळताना दिसत आहेत. आयपीएल मुळे बीसीसीआयला जबरदस्त फायदा मिळतोय. आयपीएल ने भारतीय क्रिकेट एका नव्या उंचीवर आणून ठेवले आहे.

दरम्यान, आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानने सुद्धा लीग क्रिकेटचे आयोजन केलेले आहे. यामुळे सध्या भारताच्या आयपीएलचे आणि पाकिस्तानच्या लीग क्रिकेटची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. असे असतानाच भारतीय क्रिकेट बोर्डाने अर्थातच बीसीसीआयने अलीकडेच भारतीय क्रिकेटपटूंसाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले आहेत.

बीसीसीआयने भारताच्या 34 स्टार क्रिकेटपटूंना आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिले असून या लिस्ट मध्ये जगातील नंबर एकचा फलंदाज शुभमन गिल याचाही नंबर लागतो. खरंतर शुभमान गिल याला भारतीय क्रिकेटचे फॅन्स प्रिन्स म्हणून ओळखतात. त्याला फ्युचर किंग कोहली असं म्हटलं जातंय. यामुळे अनेकांच्या माध्यमातून शुभमनला भारतीय क्रिकेट बोर्ड कडून किती सॅलरी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान आज आपण शुभमनच्या सॅलरीच्या पगाराची माहिती पाहणार आहोत. तसेच पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि जगातील नंबर 2 चा फलंदाज बाबर आजम आणि नंबर 1 फलंदाज गिल यांच्या सॅलरीमध्ये नेमका किती फरक आहे ? याबाबतही आज आपण माहिती पाहणार आहोत.

गिलला किती सॅलरी मिळते?

बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएलचा थरार सुरू असतानाच भारतीय खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले आहेत. यात शुभमन गिलला स्थान देण्यात आले आहे. स्टार बॅटर शुभमन गिलला बीसीसीआयने ए श्रेणीत स्थान दिले असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. खरे तर, बीसीसीआय सध्या ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये सॅलरी ऑफर करत आहे.

महत्त्वाची बाब अशी की भारतीय खेळाडूंना दिले जाणारे हे वेतन सामन्यासाठी दिल्या जाणाऱ्या शुल्कापेक्षा वेगळे आहे. याचाच अर्थ प्रिन्स शुभमन गिल याला बीसीसीआय कडून वार्षिक पाच कोटी रुपयांची सॅलरी मिळणार आहे. तसेच याशिवाय गिल याला प्रत्येक सामन्यासाठी एक ठराविक शुल्क देखील मिळणार आहे.

मात्र सामन्याचे शुल्क हे एकदिवसीय, टी20 आणि कसोटीनुसार बदलते. खरेतर, जगातील नंबर एकचा बॅट्समन म्हणून शुभमन गिलला ए प्लस श्रेणीत ठेवले जाऊ शकते अशी अपेक्षा त्याच्या फॅन्सला होती, अनेक क्रिकेटच्या चाहत्यांना असेच वाटत होते. पण सध्या तरी बीसीसीआयने त्याला फक्त ए श्रेणीतच ठेवले आहे.

गिल की बाबर कोणाला मिळतो जास्त पगार

दुसरीकडे पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर बाबत बोलायचं झालं तर बाबरला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला ए कॅटेगिरी मध्ये ठेवलेले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये फक्त 25 खेळाडूंना स्थान दिले आहे. या खेळाडूंना ए, बी, सी आणि डी अशा चार कॅटेगिरीमध्ये डिवाइड करण्यात आले आहे.

यातील ए कॅटेगिरी मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने फक्त दोन खेळाडूंना स्थान दिले आहे आणि त्यामध्ये बाबरचा समावेश होतो. खरेतर ए कॅटेगिरी मध्ये समाविष्ट खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून 1.65 कोटी रुपयांचा पगार दिला जातोय. म्हणजे बाबरला सुद्धा एवढाच पगार मिळणार आहे.

याव्यतिरिक्त त्याला सामना शुल्क सुद्धा मिळणार आहे. परंतु भारतीय खेळाडूंची तुलना केली असता पाकिस्तान मधील खेळाडूंना फारच कमी सामना शुल्क मिळते. एकंदरीत बाबरचा पगार हा शुभमन पेक्षा कमी आहे आणि त्याला सामना शुल्क देखील शुभमन पेक्षा फारच कमी मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News