India’s Safest Bank : भारतातील बहुतांशी लोकसंख्या आता बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहे. अगदीच खेड्यापाड्यात सुद्धा आता बँकिंग व्यवस्थेचे जाळे विस्तारलेले दिसते. केंद्रातील मोदी सरकारने जनधन योजना सुरू केल्यानंतर देशातील बँक खाते धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पुढे भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन झाले. याचाही प्रभाव म्हणून अनेक जण बँकेच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.
आता पैशांचा व्यवहार हा बँकेच्या माध्यमातून होतोय. फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, whatsapp पे अशा वेगवेगळ्या यूपीआय पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून आता डिजिटल व्यवहार होत आहेत. यामुळे देशातील कॅश फ्लो काही प्रमाणात कमी झाला आहे.

दरम्यान जर तुमचेही एखाद्या बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर देशातील खाजगी, सहकारी, सरकारी तसेच एनबीएफसी कंपन्यांवर रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कमांड असते. बँकांना आरबीआयचे नियम ऐकावे लागतात तसेच आरबीआय कडे बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा सुद्धा अधिकार असतो.
बँक दिवाळखोर झाली म्हणजेच बँक बुडाली तर सदर बँकेचे लायसन्स रद्द होते. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आलेले आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आता याच बाबत आरबीआय कडून मोठी अपडेट हाती आली आहे. आरबीआय ने देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप तीन बँकांबाबत माहिती दिली आहे.
भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या?
देशाच्या मध्यवर्ती बँकेने भारतातील तीन बँकांना सर्वाधिक सुरक्षित बँक असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाची बाब अशी की यामध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी बँका आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच एचडीएफसी बँक आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आयसीआयसीआय या यादीत समाविष्ट आहे.
या तीनही बँका देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जातात कारण असे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकांना डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक म्हणजेच D-SIBs च्या कॅटेगिरी मध्ये ठेवलेले आहे. मध्यवर्ती बँकेकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी D-SIBs बँकांची यादी जाहीर झाली आहे.
तसेच ही यादी जाहीर करताना आरबीआयने असेही सांगितले आहे की, गेल्या वर्षी देखील या तीन बँकांचा या यादीत समावेश करण्यात आला होता. जाणकार लोक सांगतात की, डी-एसआयबीएस बँकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या बँका देशांतर्गत वित्तीय व्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात.
म्हणून या बँका कधीच बुडू शकत नाही. या तिन्ही बँका देशातील सर्वात सुरक्षित बँका मानल्या जातात. कारण की या बँका बुडण्याच्या अवस्थेत पोहोचल्या तर सरकार स्वतः या बँकांना वाचवण्यासाठी पुढाकार घेते. कारण या बँका बुडाल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा फटका बसू शकतो.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की D-SIBs ची सूची बनवण्याची ही व्यवस्था 2014 मध्ये लागू झाली. यानंतर 2015 मध्ये या सूचीमध्ये एसबीआयचा समावेश करण्यात आला, पुढे 2016 मध्ये आयसीआयसीआय बँकेचा यात समावेश झाला आणि 2017 मध्ये एचडीएफसी ही बँक यात समाविष्ट करण्यात आली.
D-SIBs यादीमधल्या बँका सर्वात सुरक्षित का?
खरेतर, बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांनी सांगितल्याप्रमाणे, या यादीत समाविष्ट असलेल्या बँकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक जोखमींना तोंड देता यावे म्हणून अधिक भांडवल ठेवावे लागते. या बँकांना त्यांच्या बकेटनुसार कॉमन इक्विटी टियर 1 कायम ठेवावे लागते. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 मार्च 2024 पर्यंत मिळालेल्या डेटाच्या आधारे D-SIBs बँकांची यादी जाहीर केली होती.