Drinking Water Rule : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 मूलभूत गरजा. पाणी हे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी फारच महत्त्वाची भूमिका निभावत असते. असं म्हणतात की उत्तम आरोग्य हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असते. यामुळे आपण सर्वजण आपल्या शरीर निरोगी ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यायला.
जाणकार लोक सांगतात की आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अनेक जण जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतात किंबहुना आपल्यापैकी अनेक जण लिमिट पेक्षा जास्त पाणी सुद्धा पीत असतील. आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पण तसे नाही, जसे कमी पाणी पिणे हानिकारक आहे, तसेच जास्त पाणी पिणेही शरीरासाठी घातक ठरू शकते असा दावा आरोग्यातील तज्ञांकडून करण्यात आला आहे. यामुळे आज आपण दिवसभरात एका व्यक्तीने नेमके किती पाणी प्यायला हवे याच बाबत माहिती जाणून घेणार आहोत.
एका दिवसाला किती पाणी प्यावे ?
आरोग्य तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही माणसाचे वजन हे पाण्यामुळेच असते, शरीराचे 50 ते 70 टक्के वजन पाण्यामुळे असते. कारण की, शरीरातील पेशींना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेशी पाण्याची गरज असते.
पाण्याची कमतरता झाल्यास पेशींमधील द्रव कमी होतो आणि शरीर योग्य कार्यक्षमतेने काम करण्यास असमर्थ ठरते. खरेतर, पाणी हे जीवन आहे. पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम सुद्धा करते.
याव्यतिरिक्त पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करणे, व विविध शारीरिक क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे. यामुळे नक्कीच आपण दररोज शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यायला हवे.
मात्र अति तिथे माती याचूकतेप्रमाणे जास्त पाणी पिणे सुद्धा आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने माणसाने दररोज किती पाणी प्यायला हवे? याबाबत रिसर्च केलाय. या रिसर्चेनुसार पुरुषांनी दररोज सरासरी 3.7 लिटर आणि महिलांनी 2.7 लिटर फ्लूड्स घेणे गरजेचे आहे.
मात्र या फ्लूड्समध्ये केवळ पाणीच नाही, तर अन्नातून व इतर पेयांमधून मिळणारे द्रव देखील धरले जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली शारीरिक, भौगोलिक आणि वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेऊनच पाण्याचे प्रमाण ठरवावे अशीही माहिती तज्ञांकडून यावेळी देण्यात आली आहे.