Home Loan EMI : तुम्हीही नव्याने घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरेतर स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्यापैकी अनेकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नासाठी झगडत असतील. मात्र, घराचं स्वप्न अगदीच सहजासहजी पूर्ण होणे शक्य आहे.
सध्याच्या वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणं कठीण होत चाललं आहे. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात सुद्धा घराच्या किमती अशाच वाढत राहणार आहेत. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घर खरेदीचा प्लॅन बनवतात.

वास्तविक आपल्या मनपसंत ठिकाणी घर घेण्याचा निर्णय हा केवळ भावनिक नसून आर्थिकदृष्ट्याही फारच महत्त्वाचा असतो. यामुळेच नव्याने घर खरेदीसाठी योग्य आर्थिक नियोजन सुद्धा असणे आवश्यक आहे. आता घराच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की बहुतांशी लोक घर घेताना होम लोन घेतात.
पण, घरासाठी घेतलं जाणारे कर्ज फार मोठे असते साहजिकच या लोनची ईएमआय सुद्धा मोठा असतो. हेच कारण आहे की रियल इस्टेट मधील जाणकार लोक घर घेण्याआधी ग्राहकांनी काही गोष्टींचे विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देतात.
दरम्यान काही जाणकार लोकांनी घरासाठी होम लोन घेताना 50:30:20 या सूत्राचा वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे. दरम्यान आज आपण हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि याचे इम्प्लिमेंटेशन केल्यास काय फायदा होणार याबाबतची माहिती पाहणार आहोत.
काय आहे 50:30:20 फॉर्मुला
जाणकार लोक सांगतात की घर खरेदी करण्यापूर्वी लोकांनी आपली कमाई आणि खर्च यांचं अचूक गणित समजून घेणं गरजेचं आहे. आपली कमाई किती आहे, खर्च किती आहे तसेच घर खरेदी केल्यास आपल्यावर किती अतिरिक्त बोजा पडणार ? या साऱ्या गोष्टींची ग्राहकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
दरम्यान घर खरेदीसाठी 50:30:20 हा नियम फारच उपयुक्त ठरतो असे सुद्धा जाणकारांचे म्हणणे आहे. हा फॉर्मुला असं सांगतो की, आपल्या एकूण उत्पन्नातील 50% रक्कम आवश्यक खर्चांसाठी, 30% ऐच्छिक खर्चांसाठी आणि 20% गुंतवणुकीसाठी वापरायला हवी.
1 लाख पगार असेल तर EMI किती असावा
तज्ञ लोक सांगतात की जर तुमचं मासिक उत्पन्न 1 लाख रुपये असेल तर तुम्ही घरासाठी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय 30,000 रुपयांपेक्षा अधिक नसावा. दरम्यान जर तुम्ही हा नियम फॉलो करणार असाल तर तुम्ही 20 वर्षांसाठी 35 लाख, 25 वर्षांसाठी 38 लाख आणि 30 वर्षांसाठी 40 लाखांपर्यंतचं होम लोन घेणं योग्य ठरेल. दरम्यान तुमची आर्थिक शिस्त आणि नियोजन तुम्हाला घर घेण्यात मोठी मदत करू शकते.