रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा ; महाराष्ट्रातील ‘या’ रूटवर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी होणार ?

भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली, पण या गाडीचे तिकीट दर हे फारच अधिक आहे आणि यामुळे ही गाडी सर्वसामान्यांची नाही असा आरोप सुद्धा सरकारवर होतो. अशातच, आता या गाडीचे तिकीट दर कमी होऊ शकतात अशा काही नव्या चर्चा समोर आल्या आहेत.

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन असून या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. पहिल्यांदा म्हणजे 2019 मध्ये ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर देशातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली असून ही गाडी देशातील ज्या ज्या मार्गांवर सुरू आहे तेथील प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला अभूतपूर्व असा प्रतिसाद सुद्धा दाखवला जातोय.

सध्या स्थितीला देशातील जवळपास 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात सध्या 136 वंदे भारत एक्सप्रेस चालू आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत महाराष्ट्राला एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भेट मिळालेली आहे. राज्यातील तब्बल 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात राज्याला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, CSMT ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, CSMT ते मडगाव, नागपूर ते बिलास्पुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गांवर ही गाडी सुरू असून वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अगदीच महत्वाची आणि कामाची अपडेट समोर येत आहे.

ती अपडेट म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होतील अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. पण खरंच केंद्रातील सरकारला वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी करता येणे शक्य आहे का ? वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी होणार अशा चर्चा पुन्हा सुरू का झाल्यात याचाच आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत.

तिकीट दर कमी होतील अशा चर्चा का ? 

महाराष्ट्रासहित देशभरात सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट दर कमी होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत आणि या चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे लोकसभेत एका सदस्याने या गाडीच्या तिकीट दराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

अलिकडेच केंद्राच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार रकीबुल हुसेन यांनी रेल्वेमंत्र्यांना वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे कमी करण्याच्या योजनांबद्दल प्रश्न विचारला होता, त्यानंतर पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे चर्चेचा विषय बनला आहे. पण, आता प्रश्न असा आहे की, भारतीय रेल्वे खरोखरच वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे कमी करण्याचा विचार करत आहे का ? आणि हो तर ते करणे आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का ?

वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर खरच कमी होऊ शकते का?

खरेतर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चेअर कारचे भाडे प्रति व्यक्ती सुमारे 1200 ते 1600 आहे आणि एक्झिक्युटिव्ह चेअरकारचे भाडे सुमारे 2400 ते 2800 इतके आहे. दुसरीकडे, देशातील कोणत्याही एका मार्गावर, वंदे भारत एक्सप्रेसला एका फेरीत सुमारे एक हजार ते 1,500 किमी प्रवास करावा लागतो ज्याचा दररोजचा खर्च हा जवळपास पाच ते आठ लाख रुपये एवढा आहे.

यामध्ये इलेक्ट्रिसिटीसाठीचे दोन ते तीन लाख रुपये, देखभालीचे एक ते दीड लाख रुपये, चालक दल आणि कर्मचारी वर्गाचे जवळपास 50 हजार रुपयांपासून ते एक लाख रुपये, खानपान आणि सेवाचे 50 हजारापासून ते एक लाख रुपये, स्वच्छतेसाठी 0.01 ते 0.02 लाख रुपये आणि विमा, ॲक्सेसरीज इत्यादीचे 50,000 पासून ते एक लाख रुपये या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत, वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे कमी करणे शक्य होईल का ? हा मोठा सवाल आहे. एकंदरीत, आपण असे म्हणू शकतो की जरी भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भाडे कमी करण्याचा आणि वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सेमी-हायस्पीड आणि लक्झरी गाड्यांची पोहोच मध्यम-निम्न वर्गापर्यंत वाढवण्याचा विचार करत असली तरी,

आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की, भारतीय रेल्वे इच्छा असूनही वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे कमी करू शकत नाही. तथापि, भाडे कमी करण्याबाबत किंवा न करण्याबाबत रेल्वे मंत्री किंवा भारतीय रेल्वेकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात रेल्वे काय निर्णय घेते ? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News