मुंबई ते कोकण प्रवास होणार वेगवान ! फडणवीस सरकारने तयार केला भन्नाट प्लॅन, मंत्री नितेश राणे यांनी दिली मोठी माहिती

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये कोकणातील अनेक नागरिक स्थायिक झाले आहेत. कामानिमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची संख्या फारच उल्लेखनीय असून याच कोकणवासीयांसाठी सरकारकडून आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि यामुळे मुंबई ते कोकण हा प्रवास फारच वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Published on -

Mumbai News : सध्या मुंबई ते कोकण आणि पुढे गोवा असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र लवकरच मुंबई ते कोकण प्रवास वेगवान होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खरे तर, मुंबई ते कोकण दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. दरम्यान जेव्हा शिमगा, होळी, गणेशोत्सव, दिवाळी असे सण येतात तेव्हा ही संख्या आणखी वाढत असते. यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये चाकरमान्यांना आपल्या गावी जाताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन

आता मुंबई ते कोकण असा प्रवास वेगवान व्हावा यासाठी एक नवीन वाहतूकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबईहून कोकणात जायचे असेल आणि कोकणातून मुंबईला यायचे असेल तर खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुरी रेल्वे सेवा यामुळे कोकणातील चाकरमान्यांना अगदी तारेवरची कसरत करावी लागते.

पण चाकरमान्यांचा त्रास आता भूतकाळात जमा होणार असून त्यांना अगदीच वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दयनीय असतांनाच आता नागरिकांसाठी एका नव्या सुपरफास्ट वाहतुकीच्या पर्यायाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यामुळे मुंबईमध्ये कामानिमित्ताने स्थायिक झालेल्या कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

खरेतर महाराष्ट्र राज्य शासनाचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबई ते कोकण हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने एक नवीन उपाय शोधून काढला आहे. एका खाजगी वृत्त संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राणे यांनी याबाबतचा भन्नाट प्लॅन सांगितला आहे.

राणे यांनी समुद्रमार्गे जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा इरादा आणि सरकारचा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे. आता आपण कोकणातील नागरिकांसाठी ही जलवाहतूक कोणत्या भागात सुरु होईल? याचा कोकणातील नागरिकांना कसा फायदा होणार याचा आढावा घेणार आहोत.

कशी असणार नवीन जलवाहतूक? 

मंत्री राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या माझगाव बंदरावरून कोकणातील मालवणपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की ही जलवाहतूक येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात सुरू होणार आहे, यासाठी सरकारने गणेश चतुर्थीचा मुहूर्त सिलेक्ट केला असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.

ही सेवा M2M जेटीमार्फत ‘रो-रो’ स्वरूपात असेल, त्यामुळे प्रवासी रो रो सेवेतून प्रवास करताना आपल्या गाड्याही सोबत घेऊन जाऊ शकतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले असून यामुळे कोकणातील चाकरमान्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. सध्या मुंबई ते मालवण हा प्रवास फारच आव्हानात्मक आहे

मात्र जलवाहतूक सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त 5 तासांमध्ये पूर्ण करता येणे नागरिकांना शक्य होणार आहे. विशेष बाब अशी की या जलवाहतुकीच्या सेवेत दोन थांबे असतील, मालवण आणि विजयदुर्ग या दोन ठिकाणी नागरिकांना उतरता आणि चढता येणार आहे. म्हणजे प्रवाशांना ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई ते मालवण आणि मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास जलद गतीने करता येणे शक्य होईल.

मंत्री राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या प्रोजेक्टला फुल पाठिंबा असल्याचे सांगितले असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पावर काम सुरू असून याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News