पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 10 ठिकाणी तयार होणार भव्य पार्किंगची व्यवस्था

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढतच आहे. दररोज लाखो प्रवासी पुणे मेट्रो ने प्रवास करत असून यामुळे पुणेकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Published on -

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात असून यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी वर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला आणि शासनाला यश आले आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल झाले असून यांना पुणेकरांच्या माध्यमातून अद्भुत असा प्रतिसाद सुद्धा दाखवला जातोय. महत्त्वाची बाब अशी की पुण्यात लवकरच तिसरा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.

शहरातील शिवाजीनगर हे मध्यवर्ती ठिकाण आता आयटी हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हिंजवडी या भागासोबत मेट्रो ने जोडले जाणार असून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.

दरम्यान याच मेट्रो मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दहा ठिकाणी ॲमेनिटी स्पेस स्पेस तयार केले जाणार असून या ठिकाणी वाहनतळ सुद्धा विकसित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिका हद्दीतील आठ आणि पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील दोन, अशा एकूण दहा ‘ॲमेनिटी स्पेस’ अर्थातच सुविधा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

या जागा बालेवाडी आणि बाणेर परिसरातील आहेत आणि या ठिकाणी वाहनतळ उभारले जाणार असल्याने मेट्रोच्या या तिसऱ्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या ठिकाणी तयार केले जाणारे वाहनतळ हे स्थानकांच्या पाचशे मीटरच्या आतच राहणार आहेत, यामुळे नक्कीच मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे.

या दहा ठिकाणच्या जागांचे एकूण क्षेत्रफळ 13,051 चौरस मीटर इतके राहणार असून या जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी संबंधितांना आदेश सुद्धा जारी केले असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. महत्त्वाची बाब अशी की पालिकेच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी वाहनतळ तयार करण्याची जबाबदारी स्वतः पालिका उचलणार आहे.

तसेच या वाहन तळांचा वापर सध्याच्या पालिकेच्या पार्किंग प्रमाणेच होणार असे सुद्धा म्हटले गेले आहे. महापालिकेने आधी जाहीर केलेले पार्किंग धोरण आता रद्द करण्यात आले आहे कारण की वाहनतळाचे शुल्क हे फारच अधिक होते.

आता नव्याने वाहणतळ निर्माण करण्याचा मोठा निर्णय पालिका कडून घेण्यात आला असला तरी देखील या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या वाहनतळाचे पार्किंग शुल्क हे तिकीट दरापेक्षा कमी असावे अशी आशा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे आता आगामी काळात महापालिकेकडून विकसित होणाऱ्या या वाहनतळाचे शुल्क नेमके कसे असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News