Mumbai Nagpur Railway : मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवले जाणार असून ही गाडी राज्यातील तब्बल 14 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याने यासंबंधीत रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुद्धा या गाडीमुळे वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
खरतर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून हीच गर्दी नियंत्रणात राहावी या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. म्हणून आज आपण याच समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस असणार वेळापत्रक
सीएसएमटी ते नागपूर विशेष गाडीची सिंगल फेरी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01017 रविवारी 27 एप्रिल 2025 रोजी चालवली जाणार आहे. ही गाडी मुंबई ते नागपूर अशी चालवली जाणार असून यामुळे मुंबईहून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
या सीएसएमटी -नागपूर एकफेरी विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर रविवारी 27 एप्रिल 2025 रोजी ही गाडी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दिवशी रात्री साडेबारा वाजता ही गाडी नागपूरच्या दिशेने प्रस्थान करणारं आणि त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.
या गाडीमुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी आशा जाणकारांनी व्यक्त केली असून या विशेष एक्सप्रेस ट्रेन चा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. आता आपण या गाडीला महाराष्ट्रातील कोणत्या 14 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे याचा एक आढावा घेणार आहोत.
कुठं थांबणार समर स्पेशल ट्रेन
मुंबई ते नागपूर दरम्यान एक फेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही समर स्पेशल ट्रेन या मार्गावरील तब्बल 14 महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मळखेड, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा या अति महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ही गाडी या मार्गावरील तब्बल 14 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याने या संबंधित रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीमुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.