Railway प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वेकडून मिळाली मंजुरी

रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आज आपण रेल्वेने कोणत्या नव्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Vande Bharat Express News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.

महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्याला आतापर्यंत 11 गाड्यांची भेट मिळाली आहे. एकट्या मुंबईला सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. या गाड्यांच्या रूट बाबत बोलायचं झालं तर राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर,

सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या अकरा महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

महत्वाचे म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी बातमी हाती आली आहे. अशातच उत्तर प्रदेश राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून रेल्वे कडून उत्तर प्रदेश मधील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान , आता आपण या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा रूट नेमका कसा राहणार याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकतीच वाराणसी मंडळातील खासदार समितीची एक अगदीच महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाले या बैठकीत पूर्वोत्तर रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

यामुळे या भागातील विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. रेल्वे कडून लवकरच पटना ते थावे मार्गे गोरखपूरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. या वंदे भारत ट्रेनला रेल्वेने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. यामुळे गोपालगंज व परिसरातील प्रवाशांना वेगवान व सोयीस्कर प्रवासाचा पर्याय मिळणार अशी माहिती जाणकार लोकांकडून यावेळी देण्यात आली आहे.

खासदार डॉ. आलोक कुमार सुमन यांनी बैठकीत गोपालगंज रेल्वे स्थानकाच्या संपर्क रस्त्याच्या खराब स्थितीवर सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी यावेळी बांधकामात पारदर्शकतेसाठी स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग अनिवार्य करण्याची मागणी सुद्धा केली. थावे स्थानकावर गाड्यांना अनावश्यक थांबवू नये, अशी सूचना सुद्धा त्यांनी यावेळी केली असल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

तसेच अरुणाचल एक्सप्रेसचा दिल्लीपर्यंत मार्गविस्तार, लखनऊ-छपरा एक्सप्रेस व छपरा-फर्रुखाबाद एक्सप्रेसचा थावेपर्यंत विस्तार, ताप्ती गंगा एक्सप्रेस व अहमदाबाद-गोरखपूर एक्सप्रेस थावेपर्यंत चालवण्याची मागणी सुद्धा या बैठकीत उपस्थित करण्यात आली असल्याचे सांगितले गेले आहे

तसेच थावे जंक्शनवर पिट व यार्ड सुविधा उभारण्याचेही खासदार महोदयांच्या माध्यमातून सुचवण्यात आले आहे. दरम्यान थावे जंक्शनला ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे यामुळे या रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासातील सर्व विकासकामे लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News