38 वर्षांपूर्वी Royal Enfield Bullet 350 ची किंमत किती होती ? 1986 मधील बुलेटचे बिल पाहून तुम्हीही चकित व्हाल, पहा….

तुम्हीही रॉयल एनफिल्डची बुलेट घेण्याचे स्वप्न पाहत आहात का? अहो मग आजचा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. खरे तर आज आपण 38 वर्षांपूर्वी रॉयल एनफिल्ड बुलेटची किंमत नेमकी किती होती ? याबाबतचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Royal Enfield Bullet : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत आहेत. साहजिकच आगामी काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा राहणार आहे यात शंकाच नाही. सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात सेल होत आहेत. चेतक, ओला सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे.

ग्रामीण भागात सुद्धा या स्कूटरची क्रेज दिसते. इलेक्ट्रिक स्कूटर सोबतच इलेक्ट्रिक बाइक सुद्धा मार्केटमध्ये आलेल्या आहेत. पण आजही देशातील टू व्हीलर सेगमेंटमधील अशा काही बाईक्स आहेत ज्या वर्षानुवर्ष ग्राहकांच्या मनावर राज्य करीत आहेत. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक चा वापर वाढत असतानाही या वर्षानुवर्षीपासून विक्री होणाऱ्या पेट्रोल बाईक्सला आजही तेवढीच पसंती मिळत आहे

किंबहुना त्यांच्या लोकप्रियतामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. Royal Enfield Bullet ही सुद्धा अशीच एक लोकप्रिय बाईक आहे. खरंतर या गाडीच्या काही फीचर्स मध्ये आणि डिझाईन मध्ये किंचित बदल झालेला आहे, पण तिचा मूळ देखावा जसा आहे तसाच ठेवण्याचा कंपनी सातत्याने प्रयत्न करते आणि यामुळेच ही गाडी गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनात आपले एक स्थान ठेवून आहे.

गाव खेड्यांमध्ये मोबाईल असावा तर एप्पलचा आणि बाईक असावी तर रॉयल इन्फिल्डची नाहीतर काहीच नसावं असं म्हणतात. यावरून आपल्याला या गाडीची लोकप्रियता किती अधिक आहे हे लक्षात येतं. दरम्यान रॉयल एनफिल्ड बुलेट 350 या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर सध्या ही गाडी दोन लाख 17 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

पण 38 वर्षांपूर्वी या गाडीची किंमत किती होती? 1986 मध्ये ही गाडी किती रुपयांना उपलब्ध होत होती? याचा तुम्ही विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण 38 वर्षांपूर्वीचे रॉयल इन्फिल्ड बुलेट 350 चे एक व्हायरल झालेले बिल पाहणार आहोत.

38 वर्षांपूर्वी काय होती किंमत ?

सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. अनेक जुने व्हिडिओ, जुने स्मार्टफोनचे व्हिडिओ स्मार्टफोनचे बिल सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातच आता सोशल मीडियावर रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे एक जून बिल व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे बिल झारखंड राज्यातील असून 38 वर्षांपूर्वीचे म्हणजेच 23 जानेवारी 1986 चे आहे.

झारखंड मधील बोकारो या डीलर चे नाव सुद्धा त्यामध्ये दिसत आहे. या जुन्या बिल मध्ये बुलेटची किंमत सुद्धा मेंशन आहे. यावरून त्यावेळी बुलेट किती रुपयांना उपलब्ध होत होती ? याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बिलानुसार 1986 मध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची किंमत ही फक्त 18,700 एवढी होती.

सध्या बुलेटची किंमत दोन लाखाच्या पुढे आहे आणि 38 वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास चार दशकांपूर्वी बुलेट 20,000 च्या आत होती. नक्कीच आता पुढे 38 वर्षानंतर बुलेटची किंमत किती वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News