आनंदाची बातमी ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘त्या’ 5 महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार, पहा…

सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वेचा प्रवास मोठा आव्हानात्मक बनलाय. रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी पाहता अनेकांना तिकीट मिळत नसल्याची वास्तविकता आहे आणि याचमुळे आता रेल्वे कडून मुंबईवरून एक विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Mumbai Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की अनेकजन आपल्या मूळ गावी जात असतात तसेच काहीजण पिकनिक साठी बाहेर निघतात. यामुळे राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते.

दरम्यान प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे. मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी देखील रेल्वे कडून नुकत्याच एका नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. ही समर स्पेशल ट्रेन मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर यादरम्यान चालवली जाणार आहे.

विशेष बाब अशी की ही ट्रेन महाराष्ट्रातील तब्बल पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला उत्तर महाराष्ट्रातीलही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला असून आज आपण मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या याच समरं स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कस आहे समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक ?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन 6 मे 2025 ते 24 जून 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. एलटीटी सुलतानपूर समर स्पेशल ट्रेन या काळात दर मंगळवारी दुपारी चार वाजून 35 मिनिटांनी एलटीटी रेल्वे स्थानकावरून सुलतानपूरच्या दिशेने निघणार आहे.

तसेच सुलतानपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशल ट्रेन पाच मे 2025 ते 23 जून 2025 या काळात चालवली जाणार असून या काळात ही गाडी सुलतानपूर रेल्वे स्थानकावरून दर सोमवारी पहाटे चार वाजता एलटीटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई ते सुलतानपूर या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण 16 फेऱ्या होणार आहेत.

म्हणजे मुंबई ते सुलतानपूर अशा आठ आणि सुलतानपूर ते मुंबई अशा आठ फेऱ्या या समर स्पेशल ट्रेनच्या होतील आणि यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली अशी.

समर स्पेशल ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर धावणारी ही समर स्पेशल ट्रेन ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, या राज्यातील महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे. तसेच भुसावळच्या पुढे ही गाडी खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपुर, लखनौ या स्थानकावर थांबेल अशी सुद्धा माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe