Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावरून एका नवीन एक्सप्रेस ट्रेन ची सुरुवात करण्यात आली असून यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे ते जोधपुर दरम्यान आता नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे.
पुणे जोधपुर दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे कडून मंजुरी मिळाली असल्याने पुणे ते जोधपुर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर पुणे ते जोधपूर अशी रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे अशी प्रवाशांचे गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी होती.

या मागणीसाठी सातत्याने रेल्वे कडे पाठपुरावा देखील सुरू होता. राजस्थानी समाजाच्या माध्यमातून यासाठी रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता आणि अखेरकार हाच पाठपुरावा आता यशस्वी झाला असून पुणे ते जोधपुर दरम्यान नवीन रेल्वे गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावरून जोधपुर साठी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली असून ही रेल्वे गाडी दररोज या मार्गावर धावताना दिसणार आहे. सध्या पुणे ते जोधपुर यादरम्यान 60 ते 70 बसेस सुरू आहेत. यावरून पुणे ते जोधपूर दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येते. मात्र बसचा प्रवास फारच आव्हानात्मक आहे त्यामुळे पुणे ते जोधपुर दरम्यान दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती.
खरे तर पुणे ते जोधपुर दरम्यान साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता मात्र पुणे जोधपुर अशी दैनंदिन रेल्वे सेवा चालू झाली पाहिजे अशी राजस्थानी समाजाची मागणी होती आणि याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवा मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब अशी की यासाठीची बुकिंग देखील येत्या काही दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे लवकरच पुणे ते जोधपूर अशी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू होणार आहे आणि याचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होताना दिसेल. दरम्यान या दैनंदिन रेल्वेला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय सुद्धा रेल्वे कडून घेण्यात आला आहे.
या नव्या एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील पाली, मारवाड, अबू रोड, पालनपूर, मेहसाना, अहमदाबाद, बडोदरा, सुरत, वापी, वसई रस्ता, कल्याण, लोणावळा, चिंचवड या ठिकाणी थांबा मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून यावेळी समोर आली आहे.