Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला एका नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून धावणार असून या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते सहरसादरम्यान अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असून या गाडीच्या संचालनानंतर मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. ही गाडी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा यादरम्यान दोन मे 2025 पासून धावणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 26 एप्रिल 2025 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन दाखल झालेली आहे. दरम्यान ही गाडी दोन मे 2025 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा यादरम्यान चालवली जाणार असून ही एक साप्ताहिक गाडी राहणार आहे
म्हणजेच ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
कस राहणार साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस – सहरसा साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ( ट्रेन क्रमांक 11015) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 2 मे 2025 पासून दर शुक्रवारी सोडली जाणार आहे,
या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी बारा वाजता सोडली जाणार असेल आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी मध्यरात्री दोन वाजता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.
तसेच सहरसा – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक 11016) सहरसा येथून चार वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पावणेचार वाजता ही गाडी मुंबईला पोहोचणार आहे.
कुठे थांबणार अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ला महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. एलटीटी – सहरसा अमृत भारत एक्सप्रेस ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ या राज्यातील महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.
तसेच या गाडीला भुसावळच्या पुढे इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्जापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपूत्र, सोनपूर, हाजीपुर जंक्शन, मुज़फ्फरपुर, समस्तीपूर, हसनपूर रोड, सलौना आणि खगड़िया जंक्शन या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे कडून प्राप्त झाली आहे.